नऊ वर्षाची चिमूरडी झाली पोरकी, सहकुटुंब दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला
निधीच्या काका आणि काकू यांनी सिन्नर कडे धाव घेतली आणि माहिती घेतली. त्यात निधी ही गंभीर जखमी झाली असून आई वडिलांचा मृत्यू झाल्याची बाब समजताच त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता.
नाशिक : शुक्रवारीची सकाळ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ठरली आहे. सिन्नर ते शिर्डी या महामार्गावर पाथरे गावाजवळ ट्रक आणि खाजगी आराम बसचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी रुग्णांवर सिन्नर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अंबरनाथ येथील ही बस शिर्डीच्या दिशेने जात होती. त्यात अनेक साईभक्त हे साई बाबांच्या दर्शनासाठी जात होते. अंबरनाथहून निघालेल्या बसमध्ये उबाळे कुटुंब होते. त्यात नऊ वर्षांची निधी उबाळे देखील होती. त्यात तिचे आईवडील देखील होते. यावेळी मृत्यू झालेल्या प्रवाशांमध्ये निधीचे आईवडीलांचा समावेश आहे. आणि अपघातात सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत त्यात निधीचा समावेश आहे. निधी या अपघातात गंभीर जखमी असली तरी दुसरींकडे तीने तिच्या आईवडिलांना गमावले आहे.
शिर्डीच्या दिशेने निधीचे काका काकू देखील प्रवास करीत होते. मात्र काका काकू हे पुढील बस मध्ये होते आणि शिर्डी जाऊन त्यांना एका बसचा अपघात झाल्याची माहिती मिळाली होती.
निधीच्या काका आणि काकू यांनी सिन्नर कडे धाव घेतली आणि माहिती घेतली. त्यात निधी ही गंभीर जखमी झाली असून आई वडिलांचा मृत्यू झाल्याची बाब समजताच त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता.
निधी उबाळे ही नऊ वर्षाची चिमुकली शुद्धीवर आल्यानंतर तीने आपल्या आई वडिलांची विचारणा सुरू केली आहे, त्यामध्ये नातेवाईकांना देखील अश्रु अनावर होत आहे.
अंबरनाथ येथील हे उबाळे कुटुंब असल्याने अंबरनाथ येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. नातेवाइकांनी शिर्डी येथे धाव घेतली असून निधीवर आलेल्या संकटाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
दहा जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये निधीची आई वैशाली आणि वडील नरेश उबाळे यांचा मृत्यू झाला असून शवविच्छेदन करून नातवाईकांच्या हाती मृतदेह दिला जात आहे.
याशिवाय निधीच्या काका काकूंनी बसचालकावर गंभीर आरोप केला आहे. भरधाव वेगाने बस चालवत होता, त्याचीच चुकी असल्याचे म्हंटले आहे.