VIDEO: काही पठ्ठ्यांनी मास्कच लावला नाही, अरे बाबांनो, कोरोना अजून गेला नाही; अजितदादांनी फटकारले

मास्क न घालून बिनधास्तपणे फिरणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. राज्याचा अर्थसंकल्प मी विधानसभेत मांडला. त्यावेळी मी मास्क घालूनच होतो. मास्क काढला नाही. मी अजूनही माक्स काढत नाही. इथं तर काही पठ्ठ्यांनी मास्कच लावला नाही.

VIDEO: काही पठ्ठ्यांनी मास्कच लावला नाही, अरे बाबांनो, कोरोना अजून गेला नाही; अजितदादांनी फटकारले
अरे बाबांनो, कोरोना अजून गेला नाही; अजितदादांनी फटकारलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 11:49 AM

पुणे: मास्क न घालून बिनधास्तपणे फिरणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)  यांनी चांगलंच फटकारलं आहे. राज्याचा अर्थसंकल्प मी विधानसभेत मांडला. त्यावेळी मी मास्क घालूनच होतो. मास्क (mask) काढला नाही. मी अजूनही माक्स काढत नाही. इथं तर काही पठ्ठ्यांनी मास्कच लावला नाही. अरे बाबांनो कोरोना अजून गेला नाही. बेफिकीर राहू नका, असं फटकारतानाच मी नाव सांगत नाही. पण आमच्या एका मंत्र्याला दोन महिन्यात तीनदा कोरोना झाला. मी मास्क घालत असून मला दोनदा कोरोना झाला. चीनमध्ये (china) पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे बाबांनो, काळजी घ्या. मास्क लावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. कात्रज येथे सहकार महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ पथाचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं.

अधिवेशन सुरू आहे. आज सुट्टी असल्याने सकाळी 7 पासून कार्यक्रम सुरू केले आहेत. ठरलं होतं कोठेही भाषण करायचं नाही, भूमिपूजन करायचं. उद्घाटनं करायची. पण आग्रह होतो बोलावं लागतं. झपाट्याने नागरिककरण होत आहे. त्यामुळे पंतप्रधानांनाही विनंती केली स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो झाली पाहिजे. राज्य सरकारचा निधी दिला जाईल, केंद्राचा निधी वेळेवर आला पाहिजे. कामं खूप मोठी आहेत. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्ते हे रुंद असलेच पाहिजे. लोक कचरा कुठेही टाकतात. हात जोडून विनंती आहे एकटं केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका काहीही करू शकत नाही लोकांची साथ हवी, असं अजित पवार म्हणाले.

प्रशासक आला तरी काळजी करू नका

एकट्या पुण्यात केवढा रस्ता तयार होतो, तो कचरा बाहेर जातो तेव्हा लोक तिकडचे लोक विचारता हे कसं? इकडं कचरा कसा टाकता? आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. प्रदूषण होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. महापालिका, जिल्हा परिषदेवर प्रशासक आला तरी नागरिकांनी काळजी करु नये. तुमचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

संबंधित बातम्या:

अवकाळीचा कहर त्यात महावितरणची भर, शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, अशी मिळवा आर्थिक मदत..!

फडणवीसांचा ‘सागर’ बंगला आणि बीकेसी पोलीस ठाण्याला छावणीचं स्वरुप; प्रसाद लाड यांचं आवाहन काय?

Pune : स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो झाली पाहिजे , अशी विनंती पंतप्रधानांकडे केली- अजित पवार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.