Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेर पडण्यापूर्वी वयाचा विचार करा, ‘या’ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग

सोलापुरात (Solapur Corona Update) सुद्धा 31 ते 50 वयोगटातील लोक कोरोनाच्या विळख्यात येत असल्याचं समोर आल आहे.

घराबाहेर पडण्यापूर्वी वयाचा विचार करा, 'या' वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 12:50 PM

सोलापूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग (CoronaVirus) वाढत असताना इकडे सोलापुरात (Solapur Corona Update) सुद्धा 31 ते 50 वयोगटातील लोक कोरोनाच्या विळख्यात येत असल्याचं समोर आल आहे. कामानिमित्त 31 ते 50 वयोगटातील लोकच घराबाहेर पडत असल्याने, या वयोगटातील लोकांना संसर्ग होण्याचा जास्त धोका असल्याचं आता समोर आलं आहे. (covid19 positive rate in 31 to 50 age group is very high in Solapur maharashtra corona update )

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालये बंद असल्याने लहान मुले बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिक कामाशिवाय बाहेर पडत नाहीत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र असं असताना घरगाडा चालवण्यासाठी, किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या 31 ते 50 वयोगटातील लोक कोरोनाबाधित होत असल्याचं चित्र आता समोर येत आहे. सोलापूर शहरातील एकूण 14 हजार 487 रुग्णांपैकी 5105 रुग्ण या वयोगटातील असल्याचं समोर आलं आहे.

कोणत्या वयोगटातील किती रुग्ण?

15 वर्षाखालील 1019 मुलांना कोरोनाचा संसर्ग

16 ते 30 वयोगटातील 3027 जण

31 ते 50 वयोगटातील 5105 जण

60 वयापुढील 2762 जण संसर्गित झाले आहेत

त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांनी आता काळजी घेणे आवश्यक बनले आहे. वृद्धांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी असले तरी मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरात आतापर्यंत मृत्यू झालेल्या 692 नागरिकांपैकी ज्येष्ठ नागरिक असून ते 51 ते 60 वयोगटातील आहेत.

सोलापुरात रुग्णसंख्येत वाढ 

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दहा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यंदाच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात शहर आणि जिल्ह्यांत चार हजार 564 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मार्च महिन्यातील 10 ते 26 मार्च या सतरा दिवसांमध्ये तब्बल 5079 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन आता पुन्हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कामाला लागले आहे

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर

राज्यात कोरोनाने हाहा:कार उडवला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, कोरोना संसर्ग (Maharashtra Corona) आटोक्यात आणणे शक्य होत नाहीये. या पार्श्वभूमीवर काल 26 मार्चला सुद्धा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल 36,902 नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांचा आकडासुद्धा शंभरी पार गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे 112 जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या 

Corona Cases and Lockdown News LIVE : नंदूरबारमध्ये 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत पुर्णत: संचारबंदी 

गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.