कोरोना लसीचे डोस ‘सीरम’मधून रवाना, पोलीस उपायुक्त नम्रता पाटलांच्या हस्ते पूजा

भारतातील पहिल्या वहिल्या कोव्हिशिल्ड लसीचे डोस आज (12 जानेवारी) पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे 5 वाजता विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी लसीचे डोस इतर शहरांमध्ये रवाना होण्यापूर्वी त्याची पूजा करण्यात आली. ( covishield vaccine Namrata Patil)

कोरोना लसीचे डोस 'सीरम'मधून रवाना, पोलीस उपायुक्त नम्रता पाटलांच्या हस्ते पूजा
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 7:49 AM

पुणे : भारतातील पहिल्या वहिल्या कोव्हिशील्ड लसीचे (covishield vaccine) डोस आज (12 जानेवारी) पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे 5 वाजता विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी लसींचे डोस इतर शहरांमध्ये रवाना होण्यापूर्वी त्याची पूजा करण्यात आली. या पुजेचा मान पुणे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (Namrata Patil) यांना मिळाला. त्यांनी हार, फुलं वाहत कंटेनरची पूजा केली. यावर बोलताना माझ्यासाठी हा मोठा मान असल्याचं नम्रता पाटील यांनी म्हटलंय. (covishield corona vaccine dispatched from pune worship is done by Pune Deputy Commissioner of Police Namrata Patil)

“सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोव्हिशील्ड या लसीचे डोस काल पुण्यात आले. यावेळी सीरम संस्थेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. देशाला ही लस मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. ,” अशी प्रतिक्रिया बहूमान मिळाल्यानंतर नम्रता पाटील यांनी व्यक्त केली.

नारळ फोडून कंटेनर रवाना

कोव्हीशिल्ड लसीचे डोस काल (11 जानेवारी) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आज या लसीचे काही डोस देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये रवाना होणार आहेत. त्याआधी लसीचे डोस कंटेनरमध्ये भरल्यानंतर त्याची नारळ फोडून पूजा करण्यात आली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांचाही मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. पुणे विमानतळावरून लसीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

दरम्यान, सीरमच्या कोव्हिशील्ड (covishield vaccine) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन (Covaxin) या दोन लसींच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर कोव्हिशील्ड लस देशाबाहेर पाठवता येणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला होता. कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीला आता थेट मार्च किंवा एप्रिल महिन्यातच परवानगी मिळू शकते. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले होते.

संबंधित बातम्या :

केंद्राचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लस तूर्तास भारतीयांनाच, निर्यातीवर बंदी

कोरोना लसीकरण: तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट आहे का? नसेल तर काय होणार?

कोरोनावरच्या तिसऱ्या लसीला मंजुरी, ‘ही’ लस ठरणार रामबाण?

(covishield corona vaccine dispatched from pune worship is done by Pune Deputy Commissioner of Police Namrata Patil)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.