धनगर आरक्षणाचा कायदा करा, अन्यथा ठाकरेंच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ देणार नाही, धनगर आरक्षण कृती समितीचा इशारा

धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पंढपूरमधील आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा होऊ देणार नाही, असा इशाराही धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला.

धनगर आरक्षणाचा कायदा करा, अन्यथा ठाकरेंच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ देणार नाही, धनगर आरक्षण कृती समितीचा इशारा
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 5:21 PM

सोलापूर (पंढरपूर) : “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. याच अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा तयार करावा,” अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा होऊ देणार नाही, असा इशाराही धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला. (create special law for Dhangar reservation unless will not allow Uddhav Thackeray to do Ashadhi Ekadashi Mahapuja warns Dhangar Reservation Action Committee)

धनगर आरक्षण कृती समितीची आज बैठक

पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाड्यामध्ये धनगर आरक्षण कृती समितीची आज (15 जून) बैठक घेण्यात आली. या बैठकीत परमेश्वर कोळेकर, आदित्य फत्तेपूरकर, पंकज देवकते, शालिवाहन कोळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर आदित्य फत्तेपूरकर यांनी बैठकीतील चर्चेचा तपशील दिला.

धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कायदा पास करावा

“सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच कारणामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी 16 जूनपासून कोल्हापूर येथे मराठा समाजाकडून आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा करण्यासाठी राज्य सरकार दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. त्याच अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कायदा पास करावा,” अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे.

… तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होऊ देणार नाही

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा. तेव्हाच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या शासकीय पूजेला यावे. जर धनगर आरक्षणावर निर्णय घेतला नाही, तर मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला येऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीकडून देण्यात आला.

इतर बातम्या :

आधी म्हणाले, संभाजीराजे पुढाकार घ्या, आता स्वत: प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात, मराठा मोर्चात सहभाग

आत्ताचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा, अजित पवारांनी प्रश्न निकाली काढला?

Video: उदयनराजे म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, अजित पवारांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील?

(create special law for Dhangar reservation unless will not allow Uddhav Thackeray to do Ashadhi Ekadashi Mahapuja warns Dhangar Reservation Action Committee)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.