Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | संजय राऊत यांना ते ट्विट भोवलं, बार्शीतल्या मुलीच्या फोटोवरून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

दोन दिवसांपूर्वी बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हल्ल्यासंदर्भात ट्विट करून संजय राऊत यांनी राजकारणात खळबळ उडवून दिली होती. मात्र आता हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं आहे.

मोठी बातमी | संजय राऊत यांना ते ट्विट भोवलं, बार्शीतल्या मुलीच्या फोटोवरून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 1:20 PM

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी बार्शी (Barshi) येथील एका घटनेचे फोटो ट्विट करून भाजप नेत्यावर गंभीर आरोप केला होता. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सवाल केला होता. हे प्रकण आता संजय राऊत यांच्यावरच उलटण्याची चिन्ह आहेत. बार्शीतील या घटनेचे फोटो ट्विट केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी रात्री उशीरा संजय राऊत यांच्याविरोधात बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आता हे प्रकरण संजय राऊत यांनाच अंगलट येण्याची शक्यता आहे.

काय होतं ट्विट?

बार्शीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेविषयी संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं. बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील ही घटना होती. एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडरी होती. मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी तिच्यावर काही तरुणांनी सत्तूर आणि तलवारीने हल्ला केला. यात ती मुलगी गंभीर जखमी झाली होती. राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. विधानपरिषदेतही यावरून आवाज उठवण्यात आला होता. मात्र या प्रकरणात आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी मुलीचा अत्यंत गंभीर, रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो ट्विट करत भाजप नेत्यांवर आरोप केले होते.

भाजपवर काय आरोप?

संजय राऊत यांनी त्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून संदेश लिहिला होता. बार्शीतील या घटनेत हल्लेखोर आणि बलात्कार करणारे भाजप पुरस्कृत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना एकप्रकारे डिवचण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला होता. राजेंद्र राऊत अपक्ष असले तरीही भाजपाचे समर्थक आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजप पुरस्कृत असा उल्लेख केल्याचं म्हटलं जातंय. मात्र आता बार्शीचा तो फोटो ट्विट केल्यावरून संजय राऊतच अडचणीत सापडले आहेत.

हा गंभीर गुन्हा…

पोक्सो कायद्यानुसार, अल्पवयीन पीडित मुलीची ओळख पटेल, असे कृत्य करणे गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र संजय राऊत यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या अल्पवयीन मुलीचा फोटो ट्विट केला होता. त्यामुळे पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.