अरोपीचा पोलिसांवर हल्ला, कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू

यवतमाळ : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांवर आरोपीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवरी येथील ही घटना आहे. यात पोलीस काँस्टेबल राजू कूडमेथे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस काँस्टेबल प्रमोद कूमरे आणि प्रमोद फूफटे गंभीर जखमी झालेत. या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. […]

अरोपीचा पोलिसांवर हल्ला, कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

यवतमाळ : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांवर आरोपीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवरी येथील ही घटना आहे. यात पोलीस काँस्टेबल राजू कूडमेथे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलीस काँस्टेबल प्रमोद कूमरे आणि प्रमोद फूफटे गंभीर जखमी झालेत. या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली.

आरोपी अनील मेश्राम याला अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यासाठी रविवारी रात्री एकच्या सुमारास पोलीस काँस्टेबल राजू कूडमेथे, प्रमोद कूमरे आणि प्रमोद फूफटे गेले होते. अचानक आरोपी अनील मेश्रामने पोलिसांवर काठीने हल्ला केला. यात पोलीस काँस्टेबल राजू कूडमेथे यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांवर मारेगांव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थीर आहे.

मारेगांव पोलिस स्टेशनमध्ये अनिल मेश्राम याच्यावर कलम 324, 452 अंतर्गत गुन्हा दाखल होता. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आरोपी न्यायालयात कधीही हजर झाला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आरोपीवर अटक वॉरंट बजावला. तो बजावण्यासाठी हे पोलिस गेले होते. जिथे त्याने पोलिसांवरच हल्ला चढवला. यापूर्वीही त्याने पोलिसांवर हल्ला केला होता.

एका पोलिसाची हत्या आणि इतर दोन पोलिसांना जखमी करणारा आरोपी अनिल मेश्राम सध्या फरार असून, यवतमाळ पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.