चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत, 4 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. (Cyclone Nisarga Electricity Restart in Raigad)

चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत, 4 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 11:22 PM

रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याला चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांचे नुकसान झाल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरुवात करुन वादळामुळे झाडे पडल्याने बंद रस्ते झाडे बाजूला करुन पूर्ववत सुरु करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले. (Cyclone Nisarga Electricity Restart in Raigad)

निसर्ग चक्रीवादळामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील 1 हजार 976 गावांपैकी 1 हजार 53 गावातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील 6 लाख 38 हजार 859 वीज ग्राहकांपैकी 4 लाख 25 हजार 305 वीज ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीतपणे मिळाला आहे.

चक्रीवादळामुळे बंद पडलेले अति उच्च दाबाचे चारही उपकेंद्रे पूर्ववत सुरू झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील 32 उपकेंद्र बंद पडले होते. त्यापैकी 29 उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. तर नादुरुस्त झालेल्या 6 हजार 773 रोहित्रांपैकी 3 हजार 954 रोहित्रे दुरुस्त करण्यात आली असून ती पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत.

उच्चदाबाचे 5 हजार 507 खांब पडले होते, त्यापैकी 1 हजार 821 खांब नव्याने उभारण्यात आले आहेत. तर लघुदाबाचे 11 हजार 89 खांब चक्रीवादळामुळे पडले होते. त्यातील 1 हजार 887 खांब नव्याने उभारण्यात आले आहेत. बाधित 261 फिडरपैकी 215 फिडर पूर्ववत सुरु करण्यात यश मिळाले आहे.

उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न अहोरात्र करण्यात येत आहेत,अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (Cyclone Nisarga Electricity Restart in Raigad)

संबंधित बातम्या :

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली-मंडणगडसाठी 25 कोटींची मदत

चक्रीवादळग्रस्तांसाठी नियमापेक्षा जास्त मदत, घरासाठी 95 हजारांऐवजी दीड लाख, दोन महिने मोफत धान्य

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.