Cyclone Nisarga | मुंबई-अलिबागमध्ये झाडं कोसळली, पुण्यात धावत्या कारवर झाड पडले, जीवितहानी नाही

पुण्यातील अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरु आहे. पुण्यात विविध भागात झाड पडण्याच्या वीस घटना घडल्या आहेत. (Cyclone Nisarga Tree collapse in Mumbai Pune Alibaug)

Cyclone Nisarga | मुंबई-अलिबागमध्ये झाडं कोसळली, पुण्यात धावत्या कारवर झाड पडले, जीवितहानी नाही
Follow us
| Updated on: Jun 03, 2020 | 4:07 PM

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईसह अलिबाग, मुरुड आणि पुणे भागातही जोरदार पावसासह वारे वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. (Cyclone Nisarga Tree collapse in Mumbai Pune Alibaug)

चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. कुलाबा, फोर्ट, मुंबई सेंट्रल, काळाचौकी, दादर भागात रस्त्यावरील झाडं कोसळून वाहनांचं आणि काही ठिकाणी दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने अद्याप कुठेही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या माध्यमातून उन्मळून पडलेली झाडं बाजूला करण्याचं काम सुरु आहे.

कफ परेडच्या सी लॉर्ड बिल्डिंगमधील जुने झाड पडले. मरिन ड्राईव्ह परिसरात जी रोड येथेही झाड उन्मळून पडलं. तर वाळकेश्वर भागात इमारतीच्या टेरेसवर पावसापासून संरक्षण करणारी प्लास्टिकची शेड सोसाट्याच्या वाऱ्याने उडून गेली.

कांदिवली पश्चिम भागात अस्मिता ज्योतिजवळ झाड पडलं. यातून दुचाकीस्वार सुदैवाने बचावला. मुंबई महापालिकेचे कर्मचारी रस्त्याच्या मधोमध पडलेले झाड हटवण्याचे काम करत आहेत. (Cyclone Nisarga Tree collapse in Mumbai Pune Alibaug)

पुण्यात झाड पडण्याच्या वीस घटना

पुण्यातील अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरु आहे. पुण्यात विविध भागात झाड पडण्याच्या वीस घटना घडल्या आहेत. पुण्यातील विमानतळ रस्त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर एका धावत्या गाडीवर झाड कोसळले. या चारचाकी वाहनात दोघे जण होते. पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक भागात झाडे रस्त्यावर पडली. पुणे-नाशिक महामार्गावर कासारवाडी येथे रस्त्याच्या मधोमध झाड पडले, पण सुदैवाने कुठली जीवितहानी नाही.

अलिबागमध्ये एक जण डीपी पोल पडल्याने जखमी

अलिबाग किनारपट्टीवर चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं. या वादळाने मोठ्या प्रमाणात वृक्ष भुईसपाट झाले. आंब्याचा तर सडाच झाला, त्याचबरोबर घरांचे पत्रे, वीज खांब कोलमडले. परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.

हेही पहा : VIDEO | रत्नागिरीत मिऱ्या समुद्रावर भरकटलेले जहाज संरक्षक भिंतीवर धडकले

अलिबागमध्ये एक जण डीपी पोल पडल्याने जखमी झाला. घरांचं छप्पर मोठ्या प्रमाणात उडाल्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना असून अलिबागमधला वीज पुरवठा खंडित झाला, तर काही प्रमाणात मोबाईल सेवा बंद आहे. आतापर्यंत जीवितहानीचं वृत्त नाही

श्रीवर्धन, अलिबाग आणि मुरुडला जोरदार पाऊस असून काही इमारतीवरचे पत्रे उडाले. कोकणात अनेक ठिकाणी झाडे पडली. दिवे आगार किनारपट्टीवर जोरदार पावसासह वारे वाहत होते. यामध्ये मुरुड आणि श्रीवर्धनच्या तहसील कार्यालयाचं थोडं नुकसान झालं. (Cyclone Nisarga Tree collapse in Mumbai Pune Alibaug)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.