नाशिकमध्ये बंडाळीचा नवा अध्याय सुरू होणार? पालकमंत्री दादा भुसे यांनी यावर म्हंटलंय ? एकनाथ शिंदे बंडाळीचा अध्याय कसा थांबवणार ?
शिंदे गटात गेलेले आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटाच्या नाशिक मधील कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.
मालेगाव (नाशिक) : शिंदे गटाच्या बंडाचा झेंडा फकविणारा पहिला आमदार नाराज आहे का? अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली होती. यावर स्वतः आमदार सुहास कांदे यांनी नाराज नाही असे सांगत पालकमंत्री दादा भुसे यांच्याबद्दल नाराजीचा पाढाच वाचला आहे. पत्रकार परिषदेत घेत शिंदे गटाच्या नाशिकमधील कारभारावरच कांदे यांनी बोट ठेवलं आहे. पक्षबांधणी किंवा पक्षासह इतर कुठल्याही कामांत विश्वासात घेतलं जात नाही म्हणून उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर सुहास कांदे यांनी आरोप केल्याने दादा भुसे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घालतील असं म्हणत कांदे यांच्या आरोपावर बोलणं टाळलं आहे. आमदार सुहास कांदे यांच्या नाराजी नंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत असतांना दादा भुसे यांनी कांदे नाराज नसून सगळं काही आलबेल असल्याचा एकप्रकारे दावा केला करत बोलण्यास टाळाटाळ केली आहे. एकूणच काय तर आमदार सुहास कांदे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलेली नाराजी भुसेंना चांगलीच जिव्हारी लागल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले आहे.
शिंदे गटात गेलेले आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटाच्या नाशिक मधील कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.
पक्षीय बांधणी, प्रशासकीय बैठका यामध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याचाच थेट आरोप कांदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कांदे यांनी आपल्याला संघर्ष करायची सवय असल्याची प्रतिक्रिया दिल्याने पुन्हा बंडाळीचा नवा अध्याय पाहायला मिळणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.
शिंदे गटातील डॅशिंग आमदार म्हणून ओळखले जाणारे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी नाशिक जिल्ह्यातील शिंदे गटाच्या कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री दादा भुसे यांनी शासकीय बैठकांचा धडाका लावलाय मात्र या एकाही बैठकीला आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यालाही सुहास कांदे यांनी उपस्थिती न लावल्याने सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
शिंदे गटातील नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही. तसेच प्रशासकीय बैठकांनाही निमंत्रण दिल जात नाही असा आरोप कांदे यांनी करत याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितल्याचही सांगितलं आहे.
मात्र नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मात्र कांदे नाराज नसल्याची प्रतिक्रिया देत सर्वकाही आलबेल असल्याचं म्हटल आहे.
सत्ता स्थापनेनंतर अवघ्या चारच महिन्यात शिंदे गटात तू-तू मै-मै सुरू झाल्याने बंडाळीतून निर्माण झालेल्या सरकारला घरघर लागते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.