Dahi Handi 2024 Celebration LIVE News 27 Aug 2024 : जय जवान पथकाला 10 थर लावण्यात अपयश

| Updated on: Aug 28, 2024 | 8:09 AM

Dahi Handi 2024 Celebration in Maharashtra LIVE News 27 Aug 2024 : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे.

Dahi Handi 2024 Celebration LIVE News 27 Aug 2024 : जय जवान पथकाला 10 थर लावण्यात अपयश

Dahi Handi 2024 Celebration LIVE : सध्या मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ढाकू माकूम, टाकू माकूम… गोविंदा रे गोपाळा याप्रमाणे सर्व ठिकाणचे गोविंदा हे हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. या दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगताना दिसत आहे. तर दुसरीकडे मालवणमध्ये बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Aug 2024 08:45 PM (IST)

    नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा छळ, अल्पवयीन मुलीने स्वत:ला संपवलं

    नाशिकच्या देवळाली गावात १५ वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:ला संपवलं आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने स्वत:ला संपवलं आहे.  विद्यार्थीनी शाळेत जातांना आणि येतांना तरुणाकडून सातत्याने विद्यार्थिनीची छेडछाड करत होता. तब्बल दीड ते दोन वर्षे छेडछाडीचा प्रकार सुरू होता.

  • 27 Aug 2024 04:06 PM (IST)

    ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीत जय जवान पथक अपयशी

    जय जवान पथकाला 10 थर लावण्यात अपयश आलं आहे. जय जवान पथकाने ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर 10 थर लावून सलामी देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

  • 27 Aug 2024 03:48 PM (IST)

    काळे बॅनर, काळे फुगे लावून दहीहंडी फोडण्यात आली

    जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडली आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने या घटनेचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. काळे बॅनर, काळे फुगे लावून दहीहंडी फोडण्यात आली आणि महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

  • 27 Aug 2024 03:26 PM (IST)

    “..पुन्हा एकदा हे सरकार स्थापन करू”, संजय निरुपम यांचा निर्धार

    राज्यासह देशभरात ठिकठिकाणी दहीहंडीनिमित्ताने थरांचा थरार पाहायला मिळतोय. सत्ताधाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंहीहंडीच्या माध्यमातून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय. आणप सर्व मिळून महाविकास आघाडीचे हंडी फोडून पुन्हा एकदा हे सरकार स्थापन करू, असे शिवसेना नेते प्रवक्ते संजय निरुपम म्हणाले आहेत.

  • 27 Aug 2024 02:52 PM (IST)

    पश्चिम बंगाल कोटा प्रकरणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलली

    पश्चिम बंगाल कोटा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पश्चिम बंगालतर्फे वकील कपिल सिब्बल यांनी वेळ मागितली, जी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.

  • 27 Aug 2024 02:37 PM (IST)

    कोलकाता प्रकरण: सीबीआयनंतर, ईडी लवकरच या प्रकरणाची चौकशी करू शकते

    सीबीआयनंतर आता ईडी कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी करू शकते. ईडी लवकरच या प्रकरणी ईसीआयआर दाखल करू शकते.

  • 27 Aug 2024 02:25 PM (IST)

    पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश – चंपाई सोरेन

    भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले की, आम्ही एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. आम्ही निवृत्तीचा विचार केला होता, पण नंतर लोकांच्या मागणीनुसार आम्ही राजकारणातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवला, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपण उद्या झारखंडला जाणार आहोत.

  • 27 Aug 2024 02:10 PM (IST)

    कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरण: हावडा ब्रिजवर आंदोलन

    पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अत्याचार-हत्या प्रकरणासंदर्भात ‘नबान्ना अभियान’ मोर्चाचा एक भाग म्हणून हावडा ब्रिजवर निदर्शने सुरू आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याच्या फोर्सचा वापर केला.

  • 27 Aug 2024 02:01 PM (IST)

    जळगावात शिंदे गटाच्या विरोधात अजित पवार गटाचं आंदोलन

    जळगावच्या एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आंदोलन केले आहे. नगरपालिकेने घरपट्टीत 15 टक्के केलेल्या वाढीला स्थगिती देण्यासाठी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष गोरख चौधरी यांनी उपोषण सुरू केले आहे.

  • 27 Aug 2024 01:19 PM (IST)

    ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा हिशोब चुकता करणार – मनोज जरांगे पाटील

    ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा हिशोब चुकता करणार असे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मत देणे जनतेच्या हातात आहे, लेकरांवर झालेला अन्याय विसरू नका त्यादिवशी यांचा करेक्ट कार्यक्रम करा असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

  • 27 Aug 2024 01:07 PM (IST)

    ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठानची लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी

    ठाणे येथील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी फोडण्यासाठी तसेच नऊ थरांच्या सलामीसाठी मुंबई,नवी मुंबई,ठाणे या ठिकाणावरून गोविंदा पथके येत आहेत.

  • 27 Aug 2024 12:59 PM (IST)

    बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इगतपुरीत आक्रोश मोर्चा

    बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इगतपुरीत आक्रोश मोर्चा निघाला आहे.  महिला अन्याय अत्याचार विरोध कृती समितीने तीन लकडी ते तहसील कार्यालय पर्यंत आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चात शेकडोच्या संख्येने महिला सहभागी झाल्या असून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहीजे अशा घोषणा देण्यात आल्या.

  • 27 Aug 2024 12:56 PM (IST)

    दहीहंडी उत्सवात आत्तापर्यंत 15 गोविंदा जखमी

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. दहीहंडी उत्सवात आत्तापर्यंत 15 गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, केईममध्ये 1, नायरमध्ये 2, सायन रुग्णालयात 2, राजावाडीमध्ये 1 , एमटी अगरवाल रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

  • 27 Aug 2024 12:48 PM (IST)

    छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, 24 तास होत आले, राज्य सरकारने चौकशी नेमली का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

    छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, चोवीस तास होत आले, राज्य सरकारने चौकशी नेमली का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.  नौदल आणि राज्य सरकारने एकमेकांकडे बोट दाखवू नये, महाराष्ट्राचा जनतेला कळले पाहिजे की हे कंत्राट ठाण्यातील कंत्राटदाराला का दिले? कंत्राट देण्यासाठी काय प्रक्रिया राबवली? असा प्रश्नही वडेट्टीवर यांनी विचारलाय.

  • 27 Aug 2024 12:37 PM (IST)

    नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी

    नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी केली जात आहे. नौदल अधिकाऱ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करून, संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.

  • 27 Aug 2024 12:31 PM (IST)

    कोणी राधा बनलं तर कोणी श्रीकृष्ण, 400 बालगोपाळांचा गोपालकाला दणक्यात

    जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ग्रामीण भागात श्रीकृष्ण जन्म उत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 400 चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या उत्सवात भाग घेतला होता. कोणी राधा बनलं, कोणी श्रीकृष्ण बनलं तर कोणी गवळण. या बालगोपाळांनी पारंपारिक वेशभूषा करून हा उत्सव अत्यंत उत्साहाता साजरा केला.

  • 27 Aug 2024 12:24 PM (IST)

    शिर्डीच्या साई मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा

    साईबाबांच्या समाधी मंदिरात पारंपारिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करण्यात आले. साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला हा सोहळा आजही मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक पाळणा हलवून श्रीकृष्ण जन्माचे स्वागत केले आहे. यावेळी साईभक्तांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

  • 27 Aug 2024 12:18 PM (IST)

    कल्याणमध्ये गणेशोत्सवाची स्वागत कमान अचानक भर रस्त्यात कोसळली

    कल्याणच्या चक्कीनाका परिसरात गणेशोत्सवाची स्वागत कमान भर रस्त्यात कोसळली आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वेचे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी लावलेली ही कमान अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी शाळेची एक रिक्षा आणि काही प्रवासी या ठिकाणी उपस्थित होते, मात्र सुदैवाने ते सर्वजण या अपघातातून बचावले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशमन पथकाने युद्ध पातळीवर काम करत कमान बाजूला काढून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र भर रस्त्यावर कमान कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

  • 27 Aug 2024 12:16 PM (IST)

    एका रात्रीत सरकार बदलते, नोटबंदी होते… मग फाशी का नाही?; बाल गोविंदांचा संताप

    बदलापूर बलात्काराच्या आरोपीला फाशी द्या, अशी मागणी माहीम कोळीवाडा येथील बाल गोविंदानी पोस्टरच्या माध्यमातून केली आहे. एका रात्रीत सरकार बदलते, नोटबंदी होते, मग फाशी का नाही? आम्हाला न्याय द्या म्हणत बाल गोविंदाचे सरकारला साकडे घातले आहे.

  • 27 Aug 2024 12:13 PM (IST)

    महिलांना सुरक्षा द्या, ठाणेकरांची दहीहंडी उत्सवात मागणी

    ठाण्यात दहीहंडी उत्सवात महिला सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. महिला आणि लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबवा, अशी मागणी करणारे फलक महिला गोविंदांच्या हातात झळकले. नराधमांना फाशी द्या महिलांना न्याय द्या म्हणंत, महिला गोविंदांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत झळकावले फलक. बदलापूरसह राज्यात इतर ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महिला गोविंदा मैदानात उतरल्या आहेत.

  • 27 Aug 2024 12:03 PM (IST)

    वरळीत थरथराट… थरांवर थर; परिवर्तनची दहीहंडी जोरात

    वरळीच्या जांबोरी मैदानात वरळी बावन चाळ प्रगती क्रीडा मंडळाने सहा थरांची सलामी देत परिवर्तन दहीहंडी उत्सवाची सुरुवात केली आहे. या परिवर्तन दहीहंडीत गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर दिसली. कोर्टाने दिलेल्या आदेशात आयोजकांनी सेल्फी बेल्ट पुरवण्याचे बंधनकारक होते. पण गोविंदांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे आयोजकांनी पाठ फिरवली आहे. भाजपच्या संतोष पांडे यांनी आयोजित केलेल्या हंडीत सेफ्टी बेल्टचा अभाव दिसून आला आहे. मैदानात चिखल असताना सुरक्षा मॅटही नसल्याचं दिसून आलं आहे.

  • 27 Aug 2024 12:01 PM (IST)

    इंडियन आयडॉल फेम गायकाची दादरच्या दहीहंडीत सहभाग

    इंडियन आयडॉल फेम आणि सुपरस्टार सिंगर आवाज उद्याचा शोचे कॅप्टन आशिष कुलकर्णी यांची खास हजेरी. दादर येथील मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाणारी आयडियल दहीहंडीला आशिष कुलकर्णी उपस्थित

  • 27 Aug 2024 11:56 AM (IST)

    पंचगंगेची पाणीपातळी ही 34 फुटांच्या वर

    गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी ही 34 फुटांच्या वर पोहोचली असून 44 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे 5784 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपत्रात होतोय.

  • 27 Aug 2024 11:55 AM (IST)

    जळगावात किती हजार शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत

    जळगाव जिल्ह्यातील 2 हजार 394 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षेसाठी जळगावात गंधे सभागृहात जिल्हाधिकारी यांनी घेतली मुख्याध्यापकांची कार्यशाळा. जळगाव जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये येत्या महिनाभरात सीसीटिव्ही कॅमेरे न बसविल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा.

  • 27 Aug 2024 11:28 AM (IST)

    पुण्यात तरुणीची हत्या

    पुण्यात तरुणीची हत्या. अज्ञाता विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. खराडी भागात नदीपात्रात मृतदेह आढळला. डोके, हात, पाय वेगळं झाल्याची घटना.

  • 27 Aug 2024 11:07 AM (IST)

    Mumbai Dahi Handi 2024 : मुंबईत या पथकाने रचले 9 थर

    मुंबईत विक्रोळी टागोरनगर येथे 9 थर रचून सलामी देण्यात आली आहे. मुंबई उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली. जोगेश्वरीच हे पथक मुंबईतील मानाच्या दहीहंड्या फोडून दुपारपर्यंत ठाण्यात दाखल होईल.

  • 27 Aug 2024 10:43 AM (IST)

    Maharashtra News: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेमन्ड कंपनीतील कर्मचारी करणार सामुदायिक आत्मदहन

    कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेमन्ड कंपनीतील कर्मचारी करणार सामुदायिक आत्मदहन… जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त… रेमन्ड कंपनीतील विविध मागण्यासाठी सामुदायिक आत्मदहनाचा इशारा

  • 27 Aug 2024 10:25 AM (IST)

    Maharashtra News: उत्तर पुणे जिल्ह्यात जन्माष्टमी साजरी

    उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावागावांमधील मंदिरांमध्ये कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली… जन्माष्टमी सोहळ्यानिमित्ताने भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते…

  • 27 Aug 2024 10:11 AM (IST)

    Maharashtra News: नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावाचा संपर्क तुटला

    नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावाचा संपर्क तुटला… अक्ककुवा तालुक्यातील नवलपुर ते माळ रस्त्यादम्यान कोसळली दरड… नवलपुर ते माळ रस्त्यालगत आलेल्या गावादरम्यान अनेक गावांचा संपर्क तुटला… प्रशासनाने तात्काळ दरड हटवण्याची ग्रामस्थांनीची मागणी…..

  • 27 Aug 2024 09:57 AM (IST)

    संजय राऊत आक्रमक

    मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यावरून राजकारण तापलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलीय. पुतळा कोसळ्याने महाराष्ट्र दु:खात आहे. सरकारच्या चेहऱ्यावर वेदना नाही, असं राऊत म्हणाले.

  • 27 Aug 2024 09:45 AM (IST)

    टेंभीनाक्यावरच्या दहीहंडीत उत्साहाचं वातावरण

    ठाणेची ओळख असलेल्या टेंभीनाक्यावरच्या ‘दिघे साहेबांची दहीहंडी’ काहीच वेळास सुरु होणार आहे. दिघे साहेबांची दहीहंडीची जय्यत तयारी सुरू आहे. मोठमोठ्या कटआउट्स पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असणारे बॅनर्स पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचही बॅनर आहे. आज दिवसभर ठाणे ,मुंबई आणि मुंबई उपनगरात दही हांडीची धूम पाहायला मिळणार आहे.

  • 27 Aug 2024 09:30 AM (IST)

    माझगावमध्ये दहीहंडीची अनोखी परंपरा

    मुंबईतील माझगावमध्ये अनोख्या पद्धतीने दहीहंडी सादरी केली जाते. लहान बाळांना ओलांडून गोविंदा पुढे जातात. दहीहंडीतील सर्वात जुनी परंपरा आहे. लहान बाळ म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार असल्याचं बोललं जातं. आई आपल्या चिमुकल्यांना घेऊन गोविंदांना ओलंडायला लावतात.

  • 27 Aug 2024 09:15 AM (IST)

    मुंबईत दहीहंडीचा उत्साह

    दादरमधील आयडीएल बुक डेपो जवळही दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. गोविंदा पथक दाखल झालेत. गोविंदा पथकांनी थर लावायला सुरुवात केली आहे. महिला गोविंदा पथकही आज दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.

  • 27 Aug 2024 08:50 AM (IST)

    Dahi Handi 2024 Celebration LIVE : मुंबईत दहीहंडीचा उत्साह, कलाकारही लावणार उपस्थिती

    बोरिवली : आज दिवसभर मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

    बोरिवली पूर्व देवीपाडा मैदानावर प्रकाश सुर्वे यांच्या तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या उत्सवामध्ये 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

    गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर, भाग्यश्री पटवर्धन, लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील यांची उपस्थिती असणार आहे

  • 27 Aug 2024 08:48 AM (IST)

    Dahi Handi 2024 Celebration LIVE : दहीहंडी पथकांवर बक्षिसांची उधळण

    भाजप, मनसे, शिंदेसह सर्वच पक्षांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

    टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी असून बक्षिसाची रक्कम पुरुषांसाठी 1 लाख 51 हजार, महिलांसाठी 1 लाख आहे.

    त्याशिवाय प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत 1 लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.

  • 27 Aug 2024 08:47 AM (IST)

    Dahi Handi 2024 Celebration LIVE : ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानाकडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर

    मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे.

    तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत.

    यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

    ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

  • 27 Aug 2024 08:45 AM (IST)

    Dahi Handi 2024 Celebration LIVE : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला

    मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला

    दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी

    दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस

Published On - Aug 27,2024 8:43 AM

Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.