खबरदारी घेऊ, पण 31 ऑगस्टला दहीहंडी साजरी करु, मनसेने शड्डू ठोकला
कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन 31 ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजित पानसे यांनी म्हटलंय.
ठाणे : कोरोना संकटामुळे अनेक सण, उत्सवांवर बंदी घालण्याची वेळ सरकारवर आली. दसरा, दिवाळीसारखे सणही अत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. अशावेळी मनसेनं मात्र दहीहंडी उत्सवासाठी शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत आणि योग्य खबरदारी घेऊन 31 ऑगस्टला विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजित पानसे यांनी म्हटलंय. (MNS to celebrate Dahihandi in Thane, says Avinash Jadhav and Abhijit Panse)
31 ऑगस्टला दहीहंडी साजरी करणार आहोत. त्यासाठी अनेक मंडळांना आवाहन केलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहीहंडी उत्सवात सामील व्हा आणि आपला मराठी सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करा, असं अभिजित पानसे यांनी म्हटलंय. मनसेच्या या आवाहनामुळे आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस या बाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मागील वर्षी दहीहंडी उत्सव रद्द
दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात मागील वर्षी शुकशुकाट पाहायला मिळाला. तर आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
स्वामी प्रतिष्ठानची कोरोना रुग्णांना मदत
ठाणे शहरात अनेक गोविंदा उत्सव मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. ठाण्यातील खेवरा सर्कल येथे दरवर्षी मोठया धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठानने देखील आपला दहीहंडी उत्सव रद्द केला होता. तर उत्सवासाठी होणारा सर्व खर्च कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत म्हणुन देणार असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. युती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष याच ठिकाणी पुरग्रस्थांना मदत करण्यात आली होती. स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणी दरवर्षी मुंबई ठाण्यातून अनेक गोविंदा पथक हजेरी लावत असतात.
JNVST Exam Date: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तारीख ठरली, 11 ऑगस्टला सर्व राज्यात परीक्षाhttps://t.co/YvxdnBDgEu#JNVST | #exam | #education
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
इतर बातम्या :
‘..मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?’ चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक सवाल
MNS to celebrate Dahihandi in Thane, says Avinash Jadhav and Abhijit Panse