Pune News : MPSC पास दर्शना पवार प्रकरण | पुणे हादरलं, प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले…

Darshana Pawar Murder Case : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच पथक केली आहेत. अशातच या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे.

Pune News : MPSC पास दर्शना पवार प्रकरण | पुणे हादरलं, प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले...
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 4:39 PM

पुणे : एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या दर्शना पवार प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. (Darshana Pawar Murder Case) दर्शनाच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये केली होती. पाच दिवसांनंत त्या मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. दर्शना पवार हिचा मृतदेह  राजगडाच्या पायथ्याला सापडला होता. आता पोलीस पुढील तपास करत असून तिची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली?  याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना तिच्या मित्रासोबत ट्रेकसाठी गडावर गेली होती. मात्र एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एका मित्रासोबत ती जात आहे. परंतु येताना तो मित्र एकटाच माघारी आला, दर्शना मात्र आलेली नव्हती. आता तो मित्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच पथक केली आहेत. अशातच या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

राजगडावर दर्शना पवार या तरूणीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्याचा तातडीने पोलीसांनी शोध घेतला पाहिजे. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. जे कोणी आरोपी असतील त्यांची गय करता कामा नये, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यासोबतच त्यांनी दर्शना पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

9 जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अकादमीत दर्शनाचा सत्कार करण्यात आलेल होता. एमपीएससी परीक्षेत ती राज्यात सहावी आल्यामुळे हा सत्कार समारंभ झाला होता. त्यानंतर 12 जून रोजी ती ट्रेकिंगला गेली.

तेव्हापर्यंत ती कुटुंबाच्या संपर्कात होती. त्यानंतर तिचा संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी अकादमीत जाऊन चौकशी केली. त्यावेळी दर्शना तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासोबत सिंहगड आणि राजगडमध्ये फिरायला गेल्याचं कळलं. तिथे हे ट्रेकिंग करणार असल्याचंही समजलं. पण दर्शना आणि राहुलचाही संपर्क होत नसल्याने अखेर पोलिसात तक्रार दिल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

दरम्यान, पोलिसांसमोर आता मोठं आव्हान असणार आहे  की, दर्शनाची हत्या नेमकी कोणी आणि का केली? त्यासोबतच तिचा मित्र राहुल हांडोरे यानेच केली असेल तर त्यामागचं कारण काय? आता राहुल हा राज्या सोडून कुठे फरार तर नाही ना झाला? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.