Dasara Melava 2024 LIVE : स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मला एक संधी द्या -राज ठाकरे

| Updated on: Oct 12, 2024 | 11:54 AM

Dasara Melava 2024 : आज राज्यात दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याबाबतचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. दसरा मेळाव्यातील महत्वाचे मुद्दे या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. यासह इतरही घडामोडी या ब्लॉगमध्ये तुम्ही दिवस भर वाचू शकता...

Dasara Melava 2024 LIVE : स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मला एक संधी द्या -राज ठाकरे
महाराष्ट्रासह देशभरातील सर्व लाईव्ह अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Oct 2024 11:54 AM (IST)

    बाळासाहेब थोरात हे स्वप्नात आहेत आणि त्यांचे स्वप्न लवकरच भंग होईल – माजी खासदार सुजय विखे पाटील यांची टीका

    बाळासाहेब थोरात हे स्वप्नात आहेत आणि त्यांचे स्वप्न लवकरच भंग होईल, अशी टीका माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.

    जातीपातीच्या राजकारणामुळे लोकसभेला माझा पराभव झाला आहे. मागासवर्गीय समाज, हिंदू मुस्लिम यांच्या मनात भिती निर्माण केली त्यामुळे माझा पराभव झाला.

  • 12 Oct 2024 11:41 AM (IST)

    यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे हेलीपॅड वरून मेळावा स्थळापर्यंत ओपन जीप मधून जाणार

    यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे हेलीपॅड वरून मेळावा स्थळापर्यंत ओपन जीप मधून जाणार आहेत.  मेळाव्यापूर्वी पंकजा मुंडे या फुलांनी सजविण्यात आलेल्या ओपन जीप द्वारे मेळाव्यास्थळी जाणार आहेत. पंकजा मुंडे तसेच प्रीतम मुंडे एकाच रथातून मेळाव्यास्थळी जाणार आहेत.

  • 12 Oct 2024 11:21 AM (IST)

    खरी शिवसेना कोणती हे अख्खा महाराष्ट्र जाणतो – विनायक राऊ

    खरी शिवसेना कोणती हे अख्खा महाराष्ट्र आणि भारत देश जाणतो. दिल्लीच्या तख्तासमोर झुकून ज्यांनी खऱ्या शिवसेने सोबत बेइमानी करून पक्ष स्थापन केला त्यांना खरी शिवसेना म्हणून घेण्याचा अधिकारच नाहीये, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

  • 12 Oct 2024 11:06 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील होमगार्ड्सना गिफ्ट

    देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील होमगार्ड्सना गिफ्ट देण्यात आलं आहे. मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता मानधन प्रतिदविस 570 रुपयांवरून 1083 रुपये करण्यात आलं आहे.

  • 12 Oct 2024 11:04 AM (IST)

    महाविकास आघाडीची उद्या दुपारी महत्वाची पत्रकार परिषद, जागावाटपासंदर्भात होणार घोषणा ?

    महाविकास आघाडीची उद्या दुपारी महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. जागावाटपासंदर्भात उद्या महत्वाची घोषणा होऊ शकते. या पत्रकार परिषदेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे उपस्थित राहणार आहेत.

  • 12 Oct 2024 10:58 AM (IST)

    मनोज जरांगे काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार?

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नारायण गडावरुन कुणावर निशाणा साधणार हे थोड्याच वेळात समोर येईल. मराठा आंदोलनाचा मुद्दा अजूनही कायम आहे. ओबीसी प्रवर्गातून समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. ते काय बोलतात याकडे राजकीय नेत्यांचे पण लक्ष आहे.

  • 12 Oct 2024 10:50 AM (IST)

    हीच क्रांतीची वेळ-राज ठाकरे

    हीच क्रांतीची वेळ आहे, असं राज ठाकरे म्हणालेत. मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता. आणि नंतर ते शस्त्र बाहेर काढता. तुम्ही सर्वांना संधी देता. ज्यांनी सांभाळलंत त्यांनी तुमच्याशी प्रतारणा केली. शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवा, हीच ती क्रांतीची वेळ, असं राज ठाकरे यांनी जनतेला संबोधून म्हटलं आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी योग्य व्यक्तीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

  • 12 Oct 2024 10:40 AM (IST)

    राज ठाकरे यांना राऊतांचा चिमटा

    तुमच्या मताशी प्रतारणा करण्यात आली असे राज ठाकरे म्हणाले. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अगदी बरोबर बोलत आहेत पण ते लुटणाऱ्यांच्या मागे लोकसभेत ते उभे राहिले होते, असा चिमटा त्यांनी काढला.

  • 12 Oct 2024 10:36 AM (IST)

    धनंजय मुंडे दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवान गडावर येणार

    अनेक वर्षांनी धनंजय मुंडे दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवान गडावर येणार आहे. थोड्याच वेळात कृषिमंत्री धनंजय मुंडे अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील भगवान गडावर येणार. भगवानगडावर श्री संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती.

  • 12 Oct 2024 10:17 AM (IST)

    संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा निशाणा

    खासदार संजय राऊत यांनी दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. खरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच आहे. डुप्लिकेट शिवसेनेचे काही लोक भाड्याने माणसं जमवून दसरा मेळावा घेतील असा घणाघात त्यांनी घातला.

  • 12 Oct 2024 10:00 AM (IST)

    दुर्बलता हा अपराध, मोहन भागवत यांचे हिंदूंना मोठे आवाहन

    दुर्बलता हा अपराध आहे, हे हिंदूंनी लवकरात लवकर समजून घ्यावे. जगात अशा काही घटना घडत आहेत. त्यात ही दुर्बलता हिंदूंसाठी घातक असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

  • 12 Oct 2024 09:49 AM (IST)

    Maharashtra News: आम्ही शरद पवारांना गुरुदक्षिणा देवून बाहेर पडलो – हसन मुश्रीफ

    आम्ही शरद पवारांना गुरुदक्षिणा देवून बाहेर पडलो… समरजितसिंह घाटगे मला निष्ठा शिकवणार का? हसन मुश्रीफ… हा कसला राजा हा तर भिकारी, हसन मुश्रीफांची घाटगेंवर टीका…

  • 12 Oct 2024 09:40 AM (IST)

    Maharashtra News: शिवसेनेच्या वेगवेगळ्या दोन दसरा मेळाव्याने आज सर्वत्र मुंबई भगवीमय

    शिवसेनेच्या वेगवेगळ्या दोन दसरा मेळाव्याने आज सर्वत्र मुंबई भगवीमय झाली आहे.. शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजीपार्कवर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होत आहे. आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या सर्व मुख्य रस्त्यावर शिंदे गटाकडून बॅनर आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. मेट्रो सिनेमा सिग्नल, फॅशन स्ट्रीट रोड, सीएसटी परिसर, जे जे फ्लाय ओव्हर, यासह मुंबईच्या सर्व रस्त्यावर शिवसेना दसरा मेळाव्याच्या बॅनर आणि झेंड्याने परिसर भगवा झाला आहे…

  • 12 Oct 2024 09:23 AM (IST)

    Maharashtra News: मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज दसरा मेळावा

    बीड जिल्ह्यातील नारायण गडावर होणार दसरा मेळावा.. राज्यभरातून दसरा मेळाव्यासाठी मराठा समाज नारायण गडावर येणार.. दुपारी बारा वाजता नारायण गडावरून मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाला सुरुवात.. जरांगे पाटील आज सरकार आणि विरोधी पक्षावर काय निशाण साधतात यावर सर्वांचे लक्ष…

  • 12 Oct 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News: पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्याच्या निमित्ताने पथसंचलन

    पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्याच्या निमित्ताने पथसंचलन… स्वागतासाठी दुतर्फा नागरिकांची, महिलांची मोठी गर्दी… भगव्या ध्वजावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागत… यावर्षी संघाचे शताब्दी वर्षात पदार्पण…

  • 12 Oct 2024 08:57 AM (IST)

    राज ठाकरे काय बोलणार?

    आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे संबोधित करणार आहेत. ‘राजमुद्रा’ या यूट्यूब चॅनेलवर राज ठाकरे यांचा पॉडकास्ट थोड्याच वेळात प्रसारित होणार आहे. या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • 12 Oct 2024 08:45 AM (IST)

    आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे

    मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावा होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होत आहे. शिवसेना शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही दसरा मेळाव्याला महत्व आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

  • 12 Oct 2024 08:35 AM (IST)

    ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात फुलांची सजावट

    पुण्याच्या आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात विजया दशमी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.  संपूर्ण मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजलंय. हजारो भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. भजन- किर्तनाच्या कार्यक्रमात दंग झाले आहेत.

  • 12 Oct 2024 08:25 AM (IST)

    विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट

    आज दसऱ्याच्या निमित्त पंढरपुरात उत्साहाचं वातावरण आहे. विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी केली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा तसंच  मंदिराच्या इतर भागांना केसरी- पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे.

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा… आज दसरा सण… या निमित्त सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर आज दिवसभर दसरा मेळावे देखील पार पडणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर मेळावा होणार आहे. तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा आयोजित केला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचाही मेळावा होणार आहे. याबाबतचे सगळे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Published On - Oct 12,2024 8:16 AM

Follow us
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.