ज्या ‘दौलत’साठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, आता त्यांना तुम्ही विचारताय तुमची लायकी आहे काय म्हणून; लायकी विचारणारे नेमके आहेत कोण?

दौलत सहकारी कारखाना बंद पडून कित्येक वर्षे झाली तरीही सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना अजून त्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन केले तर आता त्यांची लायकी विचारली जाते कधा तरी याच कामगारांनी दौलत कारखाना स्वतः चालवला होता.

ज्या 'दौलत'साठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, आता त्यांना तुम्ही विचारताय तुमची लायकी आहे काय म्हणून; लायकी विचारणारे नेमके आहेत कोण?
Daulta Factory
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 12:17 PM

मुंबईः कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी अथर्व प्रायव्हेट लिमिटेडने चालवण्यास घेतलेल्या दौलत सहकारी कारखान्यावरचा अथर्वचे मालक मानसिंग खोराटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा दौलत कारखान्याच्या (Daulat Suagar) कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यामधील चंदगड (Chandgad) तालुक्यातील सहकारी तत्वावर असलेला दौलत सहकारी साखर कारखाना कर्जबाजारी झाल्यानंतर कित्येक वर्षे बंद राहिला. त्यानंतर 2019 नंतर अथर्व प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तो चालवण्यास घेतला. त्याआधी न्युट्रियंटस कंपनीने हा कारखाना चालवण्यास घेतला होता, मात्र जिल्हा बँकेच्या अटीप्रमाणे सांगितलेली रक्कम त्यांनी जमा केली नसल्याने बँकेने 21 डिसेंबर 2018 रोजी पुन्हा ताब्यात घेतला. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये 39 वर्षे कालावधीसाठी निविदा भरुन हा कारखाना अथर्वला चालवण्यास दिला. तरीही जुन्या सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या पैशाचा प्रश्न जैसे थे होता.

आजारी कारखाना कर्जबाजारी होऊन बंद पडल्यानंतर आणि जिल्हा बँकेने तो ताब्यात घेतल्यानंतर व तो चालवण्यास दिल्यावरही जुन्या कामगारांची देणी ही बाकीच राहिली आहेत. 25-30 वर्षे नोकरी करुन सेवानिवृत्त झाल्यानंतरही दौलतकडून कामगारांना एका पैही मिळाला नाही. कारखाना कर्जबाजारी होऊन अनेक वर्षे बंद पडला या काळातही सेवानिवृत्ती कामगारांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन आपल्या मागण्या सांगितल्या पण एकाही नेत्याही त्यांची मागणी मान्य केली नाही. शुक्रवारीही आपल्या हक्काच्या पैश्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले, कारखान्याच्या मुख्य गेटवर आंदोलन छेडल्यानंतर कामगारांबरोबर संवाद साधत असतानाच मानसिंग खोराटे यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना लायकी विचारली. त्यानंतर हा सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

कामगारांच्या तोंडाला पानं पुसली

सहकारी तत्वावर चालू असलेला दौलत कारखाना ज्यावेळी खासगी कंपनीकडे चालवण्यास दिला गेला तेव्हा राजकीय नेत्यांनी फक्त शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळावा एवढच बोलून कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली.

कामगारांचे कष्टाला मोल नाही

दौलत कारखान्यावर शुक्रवारी जुन्या कामगारांनी आंदोलन पुकारले. हे आंदोलन त्यांनी त्यांच्या हक्कासाठी केले आहे. आयुष्यभर ज्यांनी दौलत कारखान्याची चाकरी केली, त्याच्या वाढीसाठी धडपड केली, त्या कामगारानाच आता तुम्ही विचारता, तुमची लायकी आहे का म्हणून. याच कामगारांनी कधी काळी हीच दौलत वाढविण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला होता.

कारखाना राजकारणाचा केंद्रबिंदू

चंदगड तालुक्यात सहकारी तत्वावर असणाऱ्या या दौलत साखर कारखान्याची स्थानीक राजकारण आणि नात्यागोत्यातील हितसंबंधावर सगळा व्यवहार जपला गेल्यानेच दौलत कारखाना कर्जबाजारी होऊन आजारी पडला आणि कालांतराने तो बंदही पडला. त्यानंतर खासगी कंपन्यांनी तो चालवण्यास घेतला असला तरी जुन्या कामगारांची देणी मात्र तशीच राहिली. त्यामुळे त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत सेवानिवृत्तीनंतरचे पैसे आणि ग्रॅच्युटीची मागणी केली, मात्र कामगारांच्या या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली, आणि दौलतचा सेवानिवृत्त कामगार रस्त्यावर आला, आणि तरीही अथर्वचे मालक मानसिंग खोराटे कामगारांना म्हणतात तुमची लायकी आहे का. मानसिंग खोराटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आणि कारखाना सोडत असल्याचे जाहीर केल्याने आता नव्या कामगारांवरही टांगती तलवार असणार आहे.

संबंधित बातम्या

Pune School | पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता पहिली ते 8 वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार; कोरोना निर्बंधात तूर्तास शिथिलता नाही – अजित पवार यांची घोषणा

Statue Of Equality: ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, कशी आहे रामानुजाचार्यांची मूर्ती; मोदी काय म्हणाले?

निलंगा ताडमुगळीमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल, मंदिरात नारळ फोडल्याने कुटुंबाचा बहिष्कार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.