दाऊदने फोन केला म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. दाऊदने फोन केला म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये, असा खळबळजनक आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दाऊदने फोन केला म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप
दाऊदने फोन केला म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोपImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:52 PM

मुंबई: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. दाऊदने फोन केला म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये, असा खळबळजनक आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने (bjp) आज आझाद मैदानात भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाकडे जात असताना पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा आरोप केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे गोंधळ झाल्याने सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं होतं. त्यामुळे आता ठाकरे सरकार मलिकांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही तर दाऊदचा दबाव आहे. त्यामुळे ते नवाब मलिकचा राजीनामा घेत नाहीए. दाऊदने फोन केला म्हणून ते त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

तात्काळ हकालपट्टी करा

या सभागृहात राजीनाम्याची घोषणा केली पाहिजे. एक मंत्री कारागृहात आहेत. तरीही मंत्रीपदावर आहेत. हे काही योग्य नाही. त्यामुळे मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी काढली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

डर्टी डझनवर कारवाई होणारच

महाराष्ट्र घोटाळामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मलिक यांना कोणी वाचवू शकत नाही. ठाकरे आणि पवार त्यांना उल्लू बनवत आहेत. टेरर फंडिंग, आतंकवाद्यांकडून जमीन घेतली, हा माणूस मंत्रिमंडळात राहूच शकत नाही. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही त्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे. जे उद्धव ठाकरेंचे डर्टी डझन आहेत, त्या सर्व डर्टी डझनवर कारवाई होणारच, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. सोमय्या हे सुद्धा आझाद मैदानात पोहोचले आहेत.

दाऊदबरोबर व्यवहार करणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा?

जनतेच्या मनात रोष आहे. लोक उत्तेजित आहेत. जो माणूस दाऊदबरोबर व्यवहार करतो तो मंत्रिमंडळात बसूच कसा शकतो? हसीना पारकरसोबत बैठका करतो त्याला मंत्रिमंडळात स्थानच कसं मिळतं? स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अल कायदा आणि जैश-ए-मोहम्मदच्या लोकांशी साटेलोटे आहे असा मंत्री मंत्रिमंडळात कसा राहतो? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला.

संबंधित बातम्या:

VIDEO: नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, भाजपच्या मोर्चाआधीच शरद पवारांचं मोठं विधान

आघाडीला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू, पण सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही; शरद पवारांनी ठणकावले

Maharashtra News Live Update : फडणवीसांसह अनेक नेते आझाद मैदानाकडे रवाना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.