लाडकी बहीण योजनेबद्दल अजितदादा यांचे मोठे विधान, चार चाकी काय ट्रॅक्टर असला तरी…
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बारामती येथे जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचा एक किस्सा सांगितला. या योजनेबाबत अनेक संभ्रम पसरविले जात आहेत. त्याचा खुलासा करताना एक महत्वाची घोषणाही त्यांनी केली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. या अधिवेशनाच्या अखरेच्या दिवशी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत अजितदादा यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले. अधिवेशन आणि निवडणूक पार पडल्यानंतर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बारामती येथे जनसन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचा एक मोठा किस्सा सांगितला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम पसरविले जात आहेत. मोठा गोंधळ निर्माण करण्यात येत आहे. मात्र, अजितदादा यांनी भर सभेत या विषयाचा खुलासा केला. तसेच, एक महत्वाची घोषणाही केली.
अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली. या योजनेवरून राज्यात बराच गोंधळ उडाला आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. तर, या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मात्र हा अर्ज भरताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी या योजनेत अनेकद महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभेत एका किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘एका महिलेने मला चार चाकी वाहन असल्यावर या योजनेचा लाभ मिळेल का? असे विचारले. त्यावर मी तिला चार चाकीच काय? ट्रॅक्टर असला तरी लाभ मिळेल असे सांगितले. त्यावर तिने पुन्हा माझे पती ड्रायव्हर आहेत. रात्री घरी येताना ते गाडी घेऊन येतात. मग, तुमचे अधिकारी ती गाडी आमचीच समजतील आणि योजनेचा लाभ देणार नाहीत असे म्हटले. असे गैरसमज अनेक महिलांचे होत आहेत. पण, तमाम ड्रायव्हर आणि त्यांच्या पत्नींना सांगू इच्छितो जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल. पण, तुमच्या स्वत:च्या नावावर चारचाकी असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.’
मुख्यमंत्री लाकडी बहीण या योजनेवरून विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. पण, त्याल आम्ही फार महत्व देत नाही. या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मला राज्यातील गरीब, वंचित माता भगिनींना मदत करायची होती. या योजनेसाठी महिलांनी अर्ज करावा. तो अर्ज वेळेत मंजूर करण्याची काळजी आम्ही घेऊ. या योजनेचा साधारण अडीच कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये रक्षाबंधन हा महत्वाचा सण आहे. या महिन्यात माझ्या भगिनीच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये येणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी केली.