Ajit Pawar : अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख – लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना अजित पवारांचं चोख प्रत्युत्तर

राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून सध्या राज्यात राजकारण रंगलं आहे. या योजनेवरून सरकार आणि विरोधी पक्ष दोघांमध्येही चांगलीच जुंपली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच सरकारने ही योजना आणल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

Ajit Pawar : अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख - लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना अजित पवारांचं चोख प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 12:27 PM

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आणि त्या मुद्यावरून राज्यात राजकारण रंगलं आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच सरकारने ही योजना आणल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मात्र विरोधकांच्या या टीकेला सरकारतर्फे चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र ही ‘लाडकी बहीण’ योजना फार काळ टिकणार नाहीत, असं सांगत विरोधकांचे टीकास्त्र सुरूच आहे. मात्र आता त्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

‘X’ (पूर्वीच ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत अकाऊंटवरून अजित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. ‘ माझी लाडकी बहीण योजना ‘ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे, असंही अजित पवारांनी सुनावलं आहे.

‘ माझी लाडकी बहीण योजना ‘ अर्जासाठी मुदतवाढ

राज्य सरकारने ही योजना जाहीर केली तेव्हा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र आता या योजनेच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात होती. या योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आणि नावनोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. ज्या भगिनी 31 ला नोंदणी करतील, त्यांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे’ असे मुख्यमंत्र्यांनी या व्हिडीओत स्पष्ट केलं. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?

– आधारकार्ड

– रेशनकार्ड

– उत्पन्नाचा दाखला

– रहिवासी दाखला

– बँक पासबुक

– अर्जदाराचा फोटो

– अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र

– लग्नाचे प्रमाणपत्र

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.