‘करेक्ट कार्यक्रम’वरून अजितदादांनी जयंत पाटलांना डिवचलं; म्हणाले, कधीतरी…

Ajit Pawar on Jayant Patil : विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत बोलत होते. यावेळी अजित पवारांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. 'करेक्ट कार्यक्रम'वरून अजितदादांनी जयंत पाटलांना डिवचलं. अजित पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

'करेक्ट कार्यक्रम'वरून अजितदादांनी जयंत पाटलांना डिवचलं; म्हणाले, कधीतरी...
अजित पवार, जयंत पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 1:41 PM

‘टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम’ हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा डायलॉग सर्वश्रृत आहे. याचवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांना डिवचलं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येतोय. यासाठी माळशिरसमधील मारकडवाडीत आंदोलन उभं राहिलं आहे. यावर बोलताना अजित पवारांनी जयंत पाटील यांनी डिवचलं आहे. तसंच हिवाळी अधिवेशनावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात भाजप नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी अजित पवारांनी अभिनंदनपर भाषण केलं.

अजित पवारांचा जयंत पाटलांनी टोला

निवडणुकीच्या काळात अनेकजण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे. मग ज्यांच्या हाती संविधान नाही त्यांना आदर नाही का? अनेकांनी संविधानातील तरतुदी वाचल्याच नाहीत. सदस्यांनी स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं क्रमप्राप्त आहे. मग विरोधकांची भूमिका नियम बाह्य नाही का? उगीच काही तरी स्टंटबाजी करायची. कधी तरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असं अजित पवार म्हणाले.

आमची बाजू खरी आहे हे नागपूर अधिवेशनात दाखवून देईल. लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या तेव्हा आम्ही रडलो नाहीत. 31 जागा आल्या तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं, आता गार वाटतंय की गरम ते तुमचं तुम्हीच बघा, असं म्हणत ईव्हीएम आरोपांवरून करणाऱ्या विरोधकांवर अजितदादांनी निशाणा साधला आहे.

अजितदादांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन

राहुल नार्वेकर यांची विधिमंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. अजित पवारांनी त्यांचं अभिनंदन केलं. सर्व सदस्यांचे अभिनंदन… राजकीय दिवसांना ३५ वर्षापासून सुरुवात केली. तेव्हा जयंत पाटील आर आर पाटील आम्ही सोबत होतो. राहुल नार्वेकर यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात शिवसेनामध्ये झाली. मोदी साहेबांच्या लाटेत मी मी म्हणणारे पराभूत झाले. तुम्ही विधानपरिषदेत चांगल काम करत होतात. माझं लक्ष तसं आताच्या मुख्यमंत्री यांचे असतं. मी तुम्हाला तिकडून इकडे आणलं. ते तुम्हाला घेऊन गेले. देवेंद्रजी बोलायला उठायचे तेव्हा तुम्ही दाखले देण्याचा प्रयत्न करायचा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपमुळे तुम्ही अध्यक्ष झालात. महाराष्ट्र विधानसभा देशाला दिशा देणारी आहे, असं म्हणत अजित पवारांनी राहुल नार्वेकरांचं अभिनंदन केलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.