‘आधी लाडका नव्हतो का? अजितदादा यांचा सवाल, मंत्री म्हणाले, ‘आता जास्त झाले…’ काय घडला किस्सा?
उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत. तुम्ही असे वक्तव्य करता? तुमच्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमी आहे. जेवढे आवाक्यात आहेत तेवढेच बोलले पाहिजे. जे शोभेल तेवढे बोलले पाहिजे. तुमच्या व्यंगावर बोलले तर तोंड लपवावे लागेल.
जळगाव : 12 सप्टेंबर 2023 | जळगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, अनिल पाटील आणि गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी काही घोषणा दिल्या. मात्र, त्याला कमी प्रतिसाद मिळाल्याने आमदार किशोर पाटील यांच्याकडे पाहत ‘आप्पा काही व्यवस्था केली की नाही?’ अशी मिश्किली केली. तर, सर्व प्रथा, परंपरा मोडून आज अतिरिक्त कार्यक्रम झाला. परवा उद्धव ठाकरे जळगावमध्ये येऊन गेले. त्यांनी जे काही वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्या डोक्याची कीव करावी वाटते असा टोला त्यांनी लगावला.
मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीला आपल्या सर्वांचे लाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, आताचे आमचे सर्वाचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार असे त्यांनी म्हटले. त्यावर अजितदादा यांनी महाजन यांना ‘पहिले लाडके नव्हते काय ? अशी कोटी केली. तेव्हा महाजन यांनी ‘आता जास्त झाले दादा’ म्हणत त्या कोटीला उत्तर दिले.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला अनेक जिल्ह्यात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेला शासकीय योजनांचा लाभ व्हावा यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातले सरकार सामन्य जनतेच्या विकासाची कामे हाती घेऊन काम करत आहे. राज्यात आधी दोघाचे सरकार होते. आता दादा आले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामुळे राज्यात विकासाची घोडदौड सुरु आहे असे मंत्री महाजन यावेळी म्हणाले.
संजय राऊत out of
जळगावमध्ये परवा उद्धव ठाकरे येऊन गेले. त्यांनी चांगलं भाषण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य राम मंदिर खुले केले जाणार आहे. पण, उद्धव ठकारे म्हणतात, ‘राम मंदिराचे निमित्त साधून भाजप दंगली करणार आहेत. जाळपोळ करणार आहेत. राजकारणाची पोळी शेकून घेणार आहेत.’ संजय राऊत काहीही बोलतात. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही. त्यांची कीव करावीशी वाटते. कारण ते out of आहेत. ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
तुमच्या व्यंगावर बोलले तर…
उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत. तुम्ही असे वक्तव्य करता? तुमच्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमी आहे. जेवढे आवाक्यात आहेत तेवढेच बोलले पाहिजे. जे शोभेल तेवढे बोलले पाहिजे. तुमच्या व्यंगावर बोलले तर तोंड लपवावे लागेल. पण, आमची ती संस्कृती नाही. तुम्ही मोठ्या पदावर राहिले आहेत. तोल सांभाळायला हवा. आज तुमच्या सेनेच्या मागे चार आमदार, चार खासदार आहेत. त्यामुळे तुमचा तोल गेला आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
जळगावमध्ये बलून बंधारे झाले तर हा भाग अधिक समृद्ध होईल. त्याशिवाय इथला दुष्काळ जाणार नाही. येथील महत्वाचे दोन प्रकल्प मार्गी लावा. यामुळे शेतीला, पिण्याला पाणी मिळेल. आमच्या अनेक मागण्या आहेत. पण सरकार आपले आहे. आमदार पाटील यांनी अनेक विकासनिधी आणला. मंत्री असून मला जमलं नाही ते तुम्हाला कसं जमलं ते तपासावे लागेल, अशी मिश्किली त्यांनी केली.