फडणवीसांनी तुम्हाला दिवाणजी म्हणून नेमलं का? माजी आमदाराचा गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल

आरक्षण देणे हे केंद्र आणि राज्य सरकारच्या हातात आहे. मात्र. काही लोकांना मध्येच आपले नाक खूपसण्याची सवय असते असा खोचक टोला लगावला. फडणवीस यांनी तुम्हाला दिवाणजी म्हणून नेमलं आहे का?

फडणवीसांनी तुम्हाला दिवाणजी म्हणून नेमलं का? माजी आमदाराचा गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल
DEVENDRA FADNAVIS AND GUNRATNA SADAVARTE Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 10:05 PM

धुळे | 8 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांचे सुरु असलेलं उपोषण काही काळ स्थगित करण्यात आलंय. मात्र, हा मुद्दा पुन्हा पुन्हा उफाळून वर येतोय. जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु असताना मराठा समाजाला मंत्री नेते आमदार यांना गाव बंदी करण्याचं आवाहन केलं. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. बीडमध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मंत्री भुजबळ यांनी बीडमध्ये जाऊन त्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. तर, राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भुजबळ यांना धारेवर धरले.

मराठा समाजाला आरक्षणाचा हा मुद्दा अजूनही पेटत आहे. मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण देता येणार नाही असे म्हणत भुजबळ यांना सल्ला दिला. तर, मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही आरक्षण देता येणार नाही असेही म्हटले आहे.

मराठा समाज याप्रमाणेच धनगर समाजाविरोधात वक्तव्य केल्याने आता धनगर समाजही सदावर्ते यांच्याविरोधात गेला आहे. मराठा समाजाला आरक्षण का नको हे सांगताना सदावर्ते म्हणाले होते की, ओबीसी सोडून आरक्षण द्या असे म्हणतात तेव्हा आपण मराठा मागास आहे हे मान्य करता. एकदा मागास आहे हे मान्य केले तर तो ओबीसीमध्येच जाऊ शकतो. यामुळे तुम्ही थेट भूमिका घ्या असा सल्ला सदावर्ते यांनी भुजबळ यांना दिला होता.

हे सुद्धा वाचा

मी राजकारणी माणूस नाही. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर, बीएमडब्ल्यू अशा सुख सोयी आहेत. त्यांना आरक्षण देणे म्हणजे ज्यांच्यासाठी हे आरक्षण आहे त्यांना समूहात येण्याचा मार्ग बंद झाला असे समजावे, असे सदावर्ते म्हणाले होते. सदावर्ते यांच्या या विधानावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी आरक्षण देता येणार नाही हे सांगणारे तुम्ही कोण? असा प्रश्न केला आहे.

धनगरांना आरक्षण देता येणार नाही, मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, असे सदावर्ते म्हणतात. धनगर ही जात नाही हे आम्ही स्वतः सांगतो. आरक्षण देणे हे केंद्र आणि राज्य सरकारच्या हातात आहे. मात्र. काही लोकांना मध्येच आपले नाक खूपसण्याची सवय असते असा खोचक टोला लगावला आहे. फडणवीस यांनी तुम्हाला दिवाणजी म्हणून नेमलं आहे का? असा सवाल करत सदावर्ते यांनी आधी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे. त्यांच्या मतांना कोण विचारतं? अशी टीकाही केली. सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक असल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.