शक्ती वाढवण्याकरता कोणी सोबत आले तर का घेऊ नये? देवेंद्र फडणवीस यांनी मांडली थेट भूमिका

सरकार चांगलं चाललं आहे. आम्ही सरकारमधील सर्व समाधानी आहोत. तीन पक्षांचे सरकार आहे. मतमतांतरे असतात. पण. त्यामुळे आमच्यात भांडणं होतील अशी परिस्थिती नाही. तुमची शक्ती वाढवण्याकरता जर कोणी सोबत याला तयार असेल तर त्याला का घेऊ नये

शक्ती वाढवण्याकरता कोणी सोबत आले तर का घेऊ नये?  देवेंद्र फडणवीस यांनी मांडली थेट भूमिका
DCM DEVENDRA FADNAVISImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 6:28 PM

मुंबई : | 28 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्रामध्ये आमची महायुती सत्तेवर आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे कोणाच्या मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. अशा प्रकारचा जो व्हिडिओ आला तो भाजपच्या ऑफिशियल ट्विटर हँडल आहे. पण सत्ताबदल करायचा असेल तर ट्विटर हँडलवर करून येईल का? पण, जाणीवपूर्वक काही लोकांनी याचा खेळ करण्याचा प्रयत्न केला. असे विषय ज्या विषयांमध्ये काहीच नाही असे विषय चालू द्यावे आणि म्हणून हा सारा खेळ सुरु आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर TV9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. राज्यात महायुती सत्तेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांची पूर्ण टर्म ते पूर्ण करतील. एकही दिवस आधी नाही. पूर्ण टर्म पूर्ण करतील. त्यांच्याच नेतृत्वात ही महायुती ते मुख्यमंत्री असतानाच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि आम्ही निवडणूक जिंकू. त्यामुळे कुणाच्या मनात शंका घेण्याचं कारणच नाही. म्हणून अशा प्रकारच्या व्हिडिओचा वेगळा अर्थ काढला गेला. मला तर याबाबत माहीतच नव्हतं. मला कुणी तरी येऊन सांगितलं. मी म्हटलं डिलीट करा असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिंदे परिपक्व आहेत. राजकीय परिस्थिती आहे. आमचा संवाद चांगला आहे. अशा एका व्हिडीओमुळे ते डिस्टर्ब होतील आणि फोन करतील एवढे अपरिपक्व ते नाहीत. काही लोकांनी जाणीवपूर्वक हा खेळ करण्याचा प्रयत्न केला. ज्या विषयात काहीच नाही ते विषय चालू द्यावेत अशी राजकीय परिस्थिती नाही. हा कुणाला इशारा वैगरे देण्याचा प्रश्न नाही. अशी काही परिस्थिती असेल असे मला वाटत नाही. सरकारमध्ये 1OO टक्के समन्वय आहे. सरकारमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्रित सरकार चालवतात त्यावेळी अडचणी असतात. पण, आज तरी अशी परिस्थिती नाही. अजितदादा आमच्यासोबत आले आहेत आणि एकत्रित राहतील.

अजित दादा शिंदे यांना इशारा आहे का?

कुणाला इशारा द्यायचा असेल तर तो व्हिडिओच्या माध्यमातून दिला जात नाही. इशारा देण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. पण असा इशारा देण्याची गरजच काय आहे. सरकार चांगलं चाललं आहे. आम्ही सरकारमधील सर्व समाधानी आहोत. आमच्यापुढे सरकार म्हणून आव्हानं खूप आहेत. त्या आव्हानांचा आम्ही सामना करत आहोत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत कुणाला इशारा देण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोणी सोबत याला तयार असेल तर…

तीन पक्षांचे सरकार आहे. मतमतांतरे असतात. पण. त्यामुळे आमच्यात भांडणं होतील अशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादी आणि त्यानंतर काही घटना घडल्या. त्याचवेळी अजितदादा यांना सांगितलं होतं की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हेच राहतील. अजितदादा आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत 2019 ला येणार होते. त्यानंतरही राष्ट्रवादीमध्ये ही चर्चा होती की भाजप सोबत गेलं पाहिजे. स्थिर सरकार आणि काम करणारे सरकार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होऊ शकत नाही. ते भाजपसोबतच होऊ शकते ही त्यांची मानसिकता होती. त्यांचे ठाम मत होते. त्यांनी येण्याचा प्रस्ताव दिला आम्हाला तो योग्य वाटला. तुमची शक्ती वाढवण्याकरता जर कोणी सोबत याला तयार असेल तर त्याला का घेऊ नये असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.