‘दुसरं काही आमच्या मनात नाही, पण…’; मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यावर दादांनी मनातलं सर्वकाही सांगितलं
देशातील लोकसभा निवडणुका झाल्या असून आता एनडीए सरकार सत्ता स्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही. यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण यंदा भाजपला बहुमत नसल्याने घटकपक्षही सोबत असणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला एकही कॅबिनेटमंत्रीपद मिळालेलं नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीस याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत नेमकं काय घडलं? आता पुढची भूमिका काय असणार याबाबत स्पष्टपणे सर्वकाही सांगितलं आहे.
आमची मागणी कॅबिनेटसाठी आहे, मात्र राज्यमंत्रिपद मिळत असल्याने ते आम्ही नाकारलं आहे. प्रफुल्ल पटेल याआधी कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा एक घटक आहे. आम्ही शपथविधीला हजेरी लावणार आहोत. जे. पी. नड्डा यांच्या घरी सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा झाली होती. मी राष्ट्रावादीचा प्रमुख म्हणून सांगितलं की आमची एक जागा जरी निवडून आली असली तरी दोन ते तीन महिन्यात दोन जागा वाढणार आहेत, असं अजित पवार म्हणाले.
आमची थांबण्याची तयारी- अजित पवार
सर्वांसोबत मी बोललो त्यानंतर कॅबिनेटपद न देता राज्यमंत्रीपद देण्याचं ठरवल्याचं सांगितल. मात्र आमच्या सर्वांचं ठरलं होतं की कॅबिनेटनची जागा प्रफुल्ल पटेल यांना मिळावी. यावर आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं असून इतर घटकपक्षांनाही राज्यमंत्रीपद देणार आहोत. त्यामुळे तफावत केलं तर योग्य राहणार नाही असं सांगण्यात आलं. त्यावर आम्ही त्यांना सांगितलं की कॅबिनेट मंत्री पद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची तयारी आहे. थांबण्याची तयारी म्हणजे दुसरं काही आमच्या मनात नाही, मनापासून आम्ही एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांनी केलेले स्पष्ट
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.