कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांचा नकार, मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला
मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही वाहन न मिळाल्याने थेट सायकलवरुन नेण्यात आला (Dead body on bicycle in belgaum).
बेळगाव : मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही वाहन न मिळाल्याने थेट सायकलवरुन नेण्यात आला (Dead body on bicycle in belgaum). ही घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील हुबळी गावात घडली आहे. कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांनी वाहन देण्यास नकार दिल्याने मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला (Dead body on bicycle in belgaum).
हुबळी गावात 15 ऑगस्टला एका 70 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडली. पण वृद्धाला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्यास एकही रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वृद्धावर उपचार होऊ शकले नाहीत आणि घरातच त्याचा रात्रीच्या दरम्यान मृत्यू झाला.
या नंतर सकाळी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा अन्य वाहन देखील मिळाले नाही. त्यामुळे मृत वृद्धाच्या कुटुंबीयांनी सायकलवरून मृतदेह स्मशानात नेण्याचा निर्णय घेतला. सायकलवरून स्मशानात मृतदेह नेण्यात येत असलेले पाहून ग्रामस्थही अवाक झाले.
जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रुग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध होणे देखील अवघड झाले आहे.
संबंधित बातम्या :
खासगी रुग्णवाहिकेसाठी पैसे नाही, 108 रुग्णवाहिका तब्बल 6 तासानंतर, उपचाराअभावी तरुणाचा तडफडून मृत्यू
रुग्णवाहिका न पोहोचल्याने दिलीप काका गेले, रत्नाकाकींना तुमच्या मदतीची गरज