Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारमध्ये मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 5 महिलांचा समावेश

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात झालाय. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झालाय.

नंदुरबारमध्ये मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 5 महिलांचा समावेश
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 9:38 PM

नंदुरबार : जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात झालाय. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झालाय. यात 5 महिलांचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. आपल्या उपजीविकेसाठी बाहेर पडलेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याने अनेक नागरिक दुःख व्यक्त करत आहेत (Death of 6 tribal labours in Nandurbar in a accident).

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या आदिवासी मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत देण्यात येणार आहे. मरण पावलेले मजूर आदिवासी असून अतिशय दुर्गम अशा धडगाव तालुक्यातील आहेत.

याशिवाय या अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या सर्वांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च प्रशासनाने उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आज या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री के. सी. पाडवी आणि जिल्हा प्रशासनाकडून याची माहिती घेतली. तसेच पीडितांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना दिल्या.

अपघातग्रस्त पिकअप टेम्पोत 27 मजूर

अपघात झालेल्या मजुरांच्या या पिकअप टेम्पोत एकूण 27 जण प्रवास करत होते. यापैकी 21 मजूर जखमी झालेत. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा पिकअप थेट 300 फूट खोलीच्या दरीत कोसळला. यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त मजुरांना तेथून बाहेर काढत उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा :

RIP Pista : ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू

धक्कादायक! रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू

संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, दहा महिलांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Death of 6 tribal labours in Nandurbar in a accident

संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्...
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्....
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल.
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्.