डोंबिवलीत पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर; पाच जणांच्या मृत्यूमुळे पाणी संघर्ष पेटणार; हाताची घडी तोंडावर बोट प्रशासनाची भूमिका
डोंबिवली : खदाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू (5 drowned) झाल्यावर कल्याणमधील ग्रामीण भागात राहणारे रहिवासी आक्रमक झाले आहेत. येथील नागरिकांसाठी रोजच्या वापरासाठी पाणी नसल्याने काल एकाच कुटुंबातील पाच जण कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेले होते. त्यावेळी पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू (Five Death) झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे येथील रहिवासी आता आक्रमक झाले […]
डोंबिवली : खदाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू (5 drowned) झाल्यावर कल्याणमधील ग्रामीण भागात राहणारे रहिवासी आक्रमक झाले आहेत. येथील नागरिकांसाठी रोजच्या वापरासाठी पाणी नसल्याने काल एकाच कुटुंबातील पाच जण कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेले होते. त्यावेळी पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू (Five Death) झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे येथील रहिवासी आता आक्रमक झाले आहेत. पाण्यामुळे येथील रहिवाशांचे जीव जात असतील तर ती प्रशासनाची चूक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत. पाणी मिळावी यासाठी आता नागरिक आक्रमक झाले असून महापालिकेवर मोर्चा (Morcha on Municipal Corporation) काढूनही पाणी मिळत नसेल तर आताय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
पाण्यामुळे पाच जणांचा मृत्यू
खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याने डोंबिवलीतील संदपमध्ये शोककळा पसरली आहे. या मृतांमध्ये दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. कपडे धुत असताना महिलांबरोबर गेलेली मुलं पाण्यात पडल्यामुळे मुलांच्या आई आणि आजीने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. यावेळी कुणालाच पोहता येत नसल्याने या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये अपेक्षा गायकवाड, मीरा गायकवाड, मयुरेश गायकवाड,मोक्ष गायकवाड, निलेश गायकवाड या पाच जणांचा या दुर्घटनेच मृ्त्यू झाला. त्यानंतर अग्निशमनच्या मदतीने पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
गाव परिसरावर शोककळा
या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली होती. या घटनेमुळेच गावातील लोक आक्रमक होत पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
प्रशासना विरोधात बाटली मोर्चा
कल्याणमधील नागरिकांनी ही दुर्घटना घडल्यानंतर बाटली मोर्चा काढून प्रशासना विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली, आता आम्हाला महापालिकेवर मोर्चा काढावा लागत आहे, पाणी प्रश्न मिटला नाही तर आयुक्त कार्यालयावरही मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होत असेल तर त्याला प्रशासन जबाबदार असून येणाऱ्या काळात तर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
आता आयुक्त कार्यालयावर मोर्चा
पाच जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे येथील लोक आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे महापालिकेवर मोर्चा काढूनही जर पाणी मिळत नसेल तर त्याही पुढे जाऊन आम्ही आता आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांच्या भावना आता तीव्र
घडलेल्या दुर्घटनेमुळे नागरिकांच्या भावना आता तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळात कल्याणच्या ग्रामीण भागातील पाणी प्रश्न पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. एवढी वाईट दुर्घटना घडूनही जर प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेत असेल तर नागरिक आक्रमक होतील, तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.