कोरोनाचा धोका वाढला! तुळजाभवानी दर्शन पासची संख्या निम्म्यावर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची संथ्या निम्यावर आणण्यात आली आहे. तसंच वृद्ध भाविक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आलाय.

कोरोनाचा धोका वाढला! तुळजाभवानी दर्शन पासची संख्या निम्म्यावर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 5:49 PM

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्यामुळे जिल्हा पातळीवर मोठे निर्णय घेतले जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख मंदिरांबाबतही निर्णय घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पासची संथ्या निम्यावर आणण्यात आली आहे. तसंच वृद्ध भाविक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आलाय.(Decrease in the number of Darshan passes of Tulja Bhavani temple)

जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश

राज्यातील मंदिरं सुरु केल्यानंतर तुळजाभवानी मंदिरात रोज 20 हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जात होती. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे आता ही संख्या निम्यावर आणण्यात आली आहे. आता रोज फक्त 10 हजार दर्शन पास दिले जाणार आहेत. तर 2 हजार पेड पास दिले जातील. त्याचबरोबर 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि 10 वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे. दरम्यान तुळजाभवानीच्या दर्शनसाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी असे 3 दिवस मोठी गर्दी असते. त्यामुळे हे 3 दिवस आणि मोठ्या सण, उत्सवाला 30 हजार मोफत पास दिले जात होते. तर इतर दिवशी 20 हजार मोफत पास दिले जात होते. पण आता ही संख्या निम्म्यावर आणण्यात येणार आहे.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोल्याला कोरोनाचा विळखा

विदर्भात अकोल्यात 74, अमरावतीत 82, अमरावती मनपा क्षेत्रात 310, यवतमाळमध्ये 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अकोला परिमंडळातच एकूण 662 रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही जिल्ह्याती मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन अॅलर्ट झालं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, त्यामुळे ही शहरं अ‍ॅलर्ट झालीत.

औरंगाबादेत शाळा बंद

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील(Aurangabad   सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार फक्त इयत्ता 10 वी ते 12 चे वर्ग सुरु असणार आहेत. 12 आणि 10 चे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश येथील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय

मोठी बातमी: कोरोनाचा धोका वाढला; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुनश्च: लॉकडाऊन

Decrease in the number of Darshan passes of Tulja Bhavani temple

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.