Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केजरीवाल जेवढे काम करतील तेवढे काम आमचे पालकमंत्री करतोय, शिंदे गटाच्या कोणत्या मंत्र्याने केला दावा

अशातच अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात शिंदे गटाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एक तर्क लावला आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

केजरीवाल जेवढे काम करतील तेवढे काम आमचे पालकमंत्री करतोय, शिंदे गटाच्या कोणत्या मंत्र्याने केला दावा
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 7:08 PM

नाशिक : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी एक भुवया उंचवणारे विधान केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे जेवढं काम करतील तेवढं काम आपले पालकमंत्री करतात असं विधान नाशिकमध्ये केसरकर यांनी माध्यमांशी बोलत असतांना केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शिक्षण, आरोग्य आणि आरोग्य सेवेच्या उपाययोजनेवरून जगभर प्रसिद्ध आहेत, दिल्ली मॉडेल विकसित करत अरविंद केजरीवाल यांनी पंजाब मध्ये प्रचार करत सत्ता मिळवली आहे. दोन राज्यात आम आदमी पक्षाला सत्ता मिळाली असून आता केजरीवाल यांनी गुजरात राज्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. तिथे केजरीवाल यांचे विविध दौरे झाले असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातच सत्ता मिळवायची असा निर्धार केजरीवाल यांनी केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी केजरीवाल जितकं काम करतात तितकं काम आपल्याकडील पालकमंत्री करतात असं म्हणून केजरीवाल यांचे काम नाही असा दावा केला आहे.

गुजरात राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट नरेंद्र मोदींसमोर राजकीय आव्हान निर्माण केले आहे.

अशातच अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात शिंदे गटाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एक तर्क लावला आहे, ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

केसरकर म्हणाले, अरविंद केजरीवाल जेवढं काम करतात तेवढं काम आपल्याकडील पालकमंत्री करतात, याशिवाय ते आठवी पर्यन्त मोफत शिक्षण देतात.

इतर राज्यात आठवी पर्यन्त शिक्षण मोफत आहे, आपल्याकडे दहावी पर्यन्त शिक्षण मोफत आहे, त्यामुळे

देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणी बदल केले, तरुणांना कोणी प्रोत्साहन दिले याचा आणि ईतर गोष्टीचा विचार केजरीवालांनी करावा असं केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल जेवढे काम करतील तेवढे काम आमचे पालकमंत्री करतोय, ईतर राज्यात आठवी तर महाराष्ट्रात दहावी पर्यंत शिक्षण फ्रि दिले जाते असे देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

याबरोबरच वॉर्ड सर्व्हे सध्या सुरू आहे, निवडणुका होणार असल्याचे देखील केसरकर यांनी म्हणत निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे म्हंटले आहे.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.