Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepali Chavan: शिवकुमार आणि रेड्डीवर कारवाई करा, अन्यथा मला फाशी द्या; दीपालीच्या आईचा टाहो

विनोद शिवकुमार याने दीपालीला गर्भवती असताना जंगलात फिरायला लावले. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. | deepali chavan suicdie

Deepali Chavan: शिवकुमार आणि रेड्डीवर कारवाई करा, अन्यथा मला फाशी द्या; दीपालीच्या आईचा टाहो
दीपाली चव्हाण
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 2:10 PM

अमरावती: दीपालीला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या डीएफओ विनोद शिवकुमार आणि अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी. अन्यथा मलातरी फाशी द्या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दीपाली चव्हाण (Deepali Chavan) हिच्या आईने व्यक्त केली. (Take action against Vinod Shivkumar and shirnivas reddy in deepali chavan suicdie case)

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी दीपालीच्या आईने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विनोद शिवकुमार याने दीपालीला गर्भवती असताना जंगलात फिरायला लावले. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतरही दीपालीला रजा न देता दुसऱ्या दिवशी कामावर हजर राहायला सांगण्यात आले. गर्भपात झाल्यावर महिलांना रजा द्यावी, असा शासकीय नियम आहे. मात्र, दीपालीला त्रास देण्याच्या उद्देशाने विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांनी तिला कामावर हजर राहायला लावले. त्यामुळे या दोघांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा मलाही फाशी द्या, असे दीपालीच्या आईने म्हटले. त्यामुळे आता यशोमती ठाकूर आणि राज्य सरकार दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दीपालीला न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरू, बेलदार समाजाचा इशारा

मेळघाटातील दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. यात आता बेलदार समाजाने सुद्धा आक्रमक भूमिका घेत दीपालीच्या समर्थनार्थ आता न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आरोपी DFO विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. त्याप्रमाणे निलंबित मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी. याप्रकरणाची सीआयडी आणि NIA मार्फत चौकशी व्हावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष राजू साळूंके यांनी केली.

संबंधित बातम्या:

नवरोबा, आपण बाळाला गमावलं, तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको, दीपाली चव्हाणचं पतीला पत्र, जसंच्या तसं

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

शिवकुमारला ताब्यात द्या, महिला आक्रमक, पोलिसांनी आरोपीला साखळी करुन कोर्टात नेलं

(Take action against Vinod Shivkumar and shirnivas reddy in deepali chavan suicdie case)

केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?
‘तुम मराठी लोग गंदा...’, मुंबईत पुन्हा मराठी माणसाचा अपमान, घडलं काय?.
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती
धनंजय मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, ट्विट करून दिली माहिती.
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं
'शिंदेंना त्या विमानातून उतरवलंय, आता ते ट्रेनचे....', राऊतांनी डिवचलं.
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार
'जो बिरोबाचा नाही झाला..', संभाजी ब्रिगेडकडून पडळकरांवर पलटवार.
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले...
पहिल्यांदाच धस-मुंडे एकत्र, नामदेव शास्त्री एकाच वाक्यात म्हणाले....
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?.
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल.