वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्याविरोधात तब्बल 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी हा दावा दाखल केला आहे.

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा
Follow us
| Updated on: Jul 23, 2019 | 4:23 PM

मुंबई : वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्याविरोधात तब्बल 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी हा दावा दाखल केला आहे. लक्ष्मण माने यांनी अंजरिया यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) आणि भाजपमध्ये काम केल्याचा आरोप केला होता.

अब्दुल रहमान अंजरिया यांनी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावरच लक्ष्मण माने यांनी आक्षेप घेतला होता. तसेच अंजरिया भाजपधार्जिणे असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अंजरिया यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला. माने यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर केलेल्या आरोपांबद्दल माफी मागावी, अशीही मागणी अंजरिया यांनी केली. लक्ष्मण माने यांनी केलेले आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचंही अंजरिया यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे लक्ष्मण माने यांनी मागील काही काळात आरोपांचा सपाटाच लावला आहे. अगदी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी यावर संयमीपणे प्रतिक्रिया देत माने आमचे नेते असल्याचे म्हटले. तसेच हा वाद आम्ही पक्षांतर्गत सोडवू असे स्पष्ट केले होते. मात्र, अंजरियांनी त्यांना जशासतसे उत्तर दिले आहे.

लक्ष्मण माने प्रकाश आंबेडकरांना काय म्हणाले?

“वंचित बहुजन आघाडी मी सुरु केली होती आणि आता यापुढे मीच तिला पुढे नेणार असंही माने यावेळी म्हणाले. वंचित आघाडी हा आमचा गरिबांचा पक्ष होता. या पक्षाचं नेतृत्त्व आम्ही बाळासाहेबांकडे दिले. बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणून बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्याकडे नेतृत्व दिलं. बाबासाहेबांच्या प्रेमापोटी आम्ही श्रद्धेने त्यांच्यासोबत गेलो. मी ईश्वर मानत नाही, कोणाच्या पायाला हात लावत नाही पण बाळासाहेब त्याला अपवाद आहेत. बाबासाहेबांना आम्ही पाहिलं नाही, पण बाळासाहेबांना पाहिलं. त्यांच्याबद्दल आम्हाला श्रद्धा आहे. त्या भावनेने आम्ही त्यांच्याकडे गेलो. पण आमचा एकही माणूस निवडून आला नाही. 70 वर्षात भटक्या विमुक्तांचा एकही प्रतिनिधी संसदेत गेला नाही.”

माझ्यामुळे सेना-भाजपला 10-12 जागा गेल्या

“वंचित बहुजन आघाडीचं मोठं नुकसान झालं. आम्ही सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेलो. पण ते काही झालं नाही. सत्ता एकट्याच्या बळावर येत नाही त्यामुळे बाळासाहेबांसोबत गेलो. आमची ताकद दाखवली. दहा-बारा जागा येतील असं वाटत होतं, पण एकही जागा आली नाही. जागा आल्या भलत्यांच्याच. ज्यांना मी आयुष्यात मदत केली नाही त्या शिवसेना-भाजप आणि प्रतिगाम्यांना दहा-बारा जागा माझ्यामुळे गेल्या, असं मला वाटतंय. आयुष्यात मी असं कधी केलं नाही, त्यामुळे असं कसं झालं याचं मला दु:ख होतंय. यावेळी माझी चूक झाली. वंचित बहुजन आघाडीमध्ये मी गेलो त्यामुळे ती चूक झाली. आरएसएस-भाजपला माझ्यामुळे मदत झाली, त्यामुळे त्यांच्या 10-12 जागा निवडून आल्या. आमची एकही आली नाही. काँग्रेसच्या किती पडल्या आणि दुसऱ्यांच्या किती आल्या यात मला इंटरेस्ट नाही. त्यांच्या जागा पडल्या या त्यांच्या कर्माने पडल्या.”

प्रकाश आंबेडकरांवर नाराज

प्रकाश आंबेडकरांचा स्वभाव, कामाची पद्धत लोकशाहीवादी नाही. मी गेल्या वर्षभरात हे अनुभवलं आहे. मोकळेपणाने काम करता येत नाही. घुसमट होतेय. त्यामुळे इथे राहण्यात अर्थ नाही, असं लक्ष्मण माने म्हणाले.

त्यांच्या कामाच्या पद्धती आहेत त्याचा विचार त्यांनी करायला हवा. आपल्याला जे काही करायचं आहे ते सर्वांनी मिळून करावं ही भूमिका लोकसभा निवडणुकीनंतर राहिली नाही. त्यामुळे समाज तुटत गेला. गैरसमज वाढत गेला. आता थांबण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे मी राजीनामा पाठवून दिला, असं लक्ष्मण माने यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.