आर्मी स्टेडियमला ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राचं नावं, राजनाथ सिंहांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान
ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरच चोप्राचं नाव आज पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आलं. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आर्मीतील ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आलाय. यावेळी नाईक सुभेदार दीपक पुनिया यांचा विशेष मेडल देऊन सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पुणे : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरच चोप्राचं नाव आज पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आलं. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आर्मीतील ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आलाय. यावेळी नाईक सुभेदार दीपक पुनिया यांचा विशेष मेडल देऊन सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसंच नाईक अर्जुनलाल जाट, नाईक सुभेदार विष्णू सर्वनंद, महाराष्ट्रातील नाईक सुभेदार अविनाश सावळे यांनाही यावेळी सन्मान केला गेला. त्यावेळी आर्मीतील ऑलिम्पिक खेळाडूंची शॉल देऊन नीरज चोप्राने राजनाथ सिंह यांचं स्वागत केलं. (Rajnath Singh honors Army Olympic athletes in Pune, Army Stadium named after Neeraj Chopra)
आर्मीतील 23 खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या सर्व खेळाडूंचं राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केलं. आर्मी स्टेडियमनला नीरज चोप्राचं नाव देण्यात आलं, ही छोटी गोष्ट नाही. हा देशवासियांकडून करण्यात आलेला सन्मान आहे, असं सिंह यावेळी म्हणाले. ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. गुरु रामदार, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले. भारतीय सेनाही त्या परंपरेला पुढे घेऊन जात आहे. भारतीय खेळाच्या इतिहासात मेजर ध्यानचंद, कॅप्टन मिल्खा सिंग, कर्नल राजवर्धनसिंह राठोड, कॅप्टन विजयकुमार यांच्या परंपरेत आता सुभेदार नीरज चोप्रानेही आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये जोडलं आहे, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी नीरज चोप्राच्या कामगिरीचं कौतुक केलं.
जिस भूमि पर आज हम सभी लोग उपस्थित हुए हैं, इसका इतिहास देखिए आप। यह खेल ही था जिसने एक शिवा नाम के बच्चे को छत्रपति शिवाजी महाराज बना दिया। गुरु रामदास, दादोजी कोंड देव और माता जीजाबाई ने बचपन से ही खेल-खेल में ऐसी शिक्षाएँ उन्हें दीं, जिसने उन्हें एक राष्ट्र-नायक में बदल दिया:RM
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) August 27, 2021
‘एका सैनिकात खरा खेळाडू दडलेला असतो’
नायब सुभेदार दीपक पुनिया आपल्या कांस्य पदकापासून काही अंतरावरुन चुकले, मात्र त्यांचं प्रदर्शन प्रशंसनीय होतं. त्यासह सुभेदार ओरोकिया राजीव यांचं 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये नवं आशियाई रेकॉर्ड बनवण्याचं प्रदर्शन कौतुकास पात्र आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले. खेळ माणसाला फक्त शारिरिक नाही तर सामाजिक, व्यावहारिक, भावनात्मक आणि मानसिक रुपानेही सुदृढ बनवतो. यामुळे माझं मत आहे की एका सैनिकात खरा खेळाडू दडलेला असतो. तर सच्च्या खेळाडूमध्ये एक सैनिक कायम असतो, असंही राजनाथ सिंह म्हणाले.
‘आपल्याला या प्रयत्नातून नवे आयाम गाठायचे आहेत’
ASI, भारतीय सेना एक अद्वितीय आणि जागरिक स्तरावरील क्रीडा संस्था आहे. मला सांगण्यात आलं की यांनी आतापर्यंत 34 ऑलिम्पिक, 22 कॉमनवेल्थ गेम्सची पदकं जिंकली आहेत. 21 एशियन गेम्स, 6 युथ ऑलिम्पिक, 13 अर्जुन पुरस्कार विजेता दिले आहेत. भारत सरकारकडून गेल्या काही वर्षात क्रीडा स्पर्धांमध्ये क्वालिटी वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. ही फक्त सरकारी स्किम नाही, तर एक आंदोलन आहे. ज्याला आपल्याला अजून पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला या प्रयत्नातून यश आणि नवे आयाम गाठायचे आहेत, असंही राजनाथ यांनी यांनी म्हटलंय.
Addressing the gathering at the inauguration of Subedar Neeraj Chopra Stadium in Pune. Watch https://t.co/g1SFpBtG6p
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 27, 2021
इतर बातम्या :
उड्डाणानंतर पायलटच्या छातीत जोराची कळ, नागपूर विमानतळावर परदेशी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
दोन एसटी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात गोंधळ
Rajnath Singh honors Army Olympic athletes in Pune, Army Stadium named after Neeraj Chopra