“…म्हणून लोकशाही संकटात”;शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरून ‘या’ नेत्यानं राजकीय संकटांची शक्यता सांगितली

आगामी निवडणुकीविषयी बोलताना आमदार भास्करराव जाधव यांनी सांगितले की, आता नुकताच दोन एजन्सीनी सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेमध्ये आता सांगण्यात आले आहे की, येत्या महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा सर्व्हे देण्यात आला आहे.

...म्हणून लोकशाही संकटात;शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरून 'या' नेत्यानं राजकीय संकटांची शक्यता सांगितली
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 8:54 PM

रत्नागिरीः शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप विरुद्ध गटातील अनेक राजकीय पक्षांनी या निर्णयाविरोधात मत व्यक्त केले होते. तर ठाकरे गटाने या निर्णयावरून देशातील लोकशाही कशी धोक्यात आली आहे असं मत व्यक्त केले गेले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेत देशातील लोकशाही संकटात आहे धोक्यात आहे असं मत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केल आहे.त्याच बरोबर सर्वश्रेष्ठ असणारे संविधान आणि घटनेलाही पायदळी तुडवले जात असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्हआणि पक्षाचे नाव गद्दारांना दिले जात असल्याचा घणाघात करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेली आहेत. त्यामुळे आगामी काळातही महाविकास आघाडीचा पॅटर्न राज्यभर राबविणार असल्याचे मत महाविकास आघाडीकडून बोलले जात आहे.सध्या महाविकास आघाडीने कसबा पोटनिवडणुकीत यश मिळवले असल्याने राजकीय गणितं चुकीची असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कारण जो पुण्यातील जो कसबा पोटनिवडणुकीतील जो प्रभाग होता तेथील मतदार पारंपरिक असल्याचे बोलले जात होते. त्यातच कसबा मतदार संघात एका विशिष्ट समाजाची मतं असल्यामुळे भाजप-शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतानाही तेथून आनंद दवे यांनी उमेदवारी भरली होती.

मात्र त्यांना फक्त 450 मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता मतदारांचा कौल बदलत असून भाजपला चारीमुंड्यी चितपट करण्यात आल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे.

तर आगामी निवडणुकीविषयी बोलताना आमदार भास्करराव जाधव यांनी सांगितले की, आता नुकताच दोन एजन्सीनी सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेमध्ये आता सांगण्यात आले आहे की, येत्या महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा सर्व्हे देण्यात आला आहे.

तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीत 34 खासदार महाविकास आघाडीचे निवडून येतील असंही भास्करराव जाधव यांनी सांगितले.

चिन्ह आणि पक्षाचा निर्णया हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला असला तरी आगामी निवडणुकीच्या काळात शिंदे गटाला जोरदार फटका बसणार असून त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.