संतोष देशमुख कुटुंबाच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती, आता त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकनाथ शिंदेंकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान आज शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. संतोष देशमुख यांची ज्या लोकांनी मिळून हत्या केली त्यातील ज्यांना अजूनही अटक झालेली नाहीये, त्यांच्या अटकेची कारवाई तातडीनं केली जाईल. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, हा एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन मी इथे आलो आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले सामंत?
संतोष देशमुख यांची ज्या लोकांनी मिळून हत्या केली त्यातील ज्यांना अजूनही अटक झालेली नाहीये, त्यांच्या अटकेची कारवाई तातडीनं केली जाईल. कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, हा एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन मी इथे आलो आहे, देशमुख कुटुंबाला मदत घेऊन शिंदे साहेबांनी पाठवलं होतं, ती मदत कुटुंबाला केली आहे. स्वतःचं घर उभं करण्यासाठी जे जे काही लागेल ते शिंदे साहेब सहकार्य करतील, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही वाचवलं जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. ज्या कोणाचा यामध्ये हात आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळून देऊ. पोलीस अधीक्षक यांनी नव्याने चार्ज घेतल्यानंतर त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही आहोत, तातडीने जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलं जाईल.. शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आयजीच्या नेतृत्वाखाली एस आय टी नेमलेली आहे. न्यायालयीन चौकशी देखील होणार आहे, त्यामध्ये जे दोषी असतील त्या कोणालाही सोडलं जाणार नाही, असं सामंत यांनी म्हटलं आहे.