Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आप पान खाते हो क्या? हमें बेवकूफ मत समझो; अजित पवार यांनी कुणाची घेतली फिरकी?

"आप पान खाते हो क्या? हमें बेवकुफ समजे क्या?" असा सवाल अजित पवारांनी विचारला. त्यानंतर त्यांनी व्यसनाने कॅन्सर होतो असे त्याला सांगितले. यानंतर त्यांनी भाषण केले.

आप पान खाते हो क्या? हमें बेवकूफ मत समझो; अजित पवार यांनी कुणाची घेतली फिरकी?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 01, 2025 | 4:44 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार हे कायमच त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. ते अनेकदा कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांचीही फिरकी घेत असतात. तर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते धारेवर धरत असतात. आता नुकतंच एका बँकेच्या मॅनेजरला अजित पवारांनी चांगलंच सुनवलं आहे. ते आज बारामती दौऱ्यावर होते.

अजित पवारांनी नुकतंच बारामतीच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे उद्धाटन केले. यावेळी अजित पवारांनी बँकेच्या मॅनेजरला एक सवाल केला आहे. “आप पान खाते हो क्या? हमें बेवकुफ समजे क्या?” असा सवाल अजित पवारांनी विचारला. त्यानंतर त्यांनी व्यसनाने कॅन्सर होतो असे त्याला सांगितले. यानंतर त्यांनी भाषण केले.

“बारामतीमध्ये विकास कामांचा डोंगर उभा”

“आज अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. मला तो अर्थसंकल्प ऐकायचा आहे. संपूर्ण जनतेचा तो अर्थसंकल्प असेल. मला पुन्हा पाच वर्षांची संधी दिली. त्यामुळे देशात बारामती एक नंबरचा तालुका बनवणार आहे. बारामतीत जनावरांसाठी सुसज्ज दवाखाने तयार करणार आहे. बऱ्हाणपूरमधील पोलीस उपमुख्यालयात वृक्षारोपण गरजेचे आहे. बारामती देशातील आदर्श शहर करायचं आहे. दर्जेदार काम करणं ही माझी जबाबदारी आहे. बारामतीमध्ये विकास कामांचा डोंगर उभा करत आहोत. कायदा-सुव्यवस्था काम चांगले राहावे म्हणून चार स्कार्पिओ गाड्या पोलिस ताफ्यात दिल्या आहेत”, असे अजित पवार म्हणाले.

“ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या”

“केंद्रीय सरकारने अर्थ संकल्प मांडला आहे‌. मला ऐकायचा होता. पण कामाच्या व्यस्त नियोजनामुळे ऐकता आले नाही. मात्र अर्थ संकल्प जनतेच्या मनातील असेल. ओबीसीला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे. नुसते कागद वाचून उपयोग नाही. माणसं पाहिले पाहिजेत. शेतकऱ्यांकडून विहिरीच्या कामासाठी कोणी पैसे घेत असेल तर त्यांचं काही खरं नाही”, असा दमही अजित पवारांनी भरला.

“बारामतीमध्ये अतिक्रमण करत असतील तर ते काढा”

“बारामती सुसज्ज शौचालय उभारणार आहे. बारामती विकासासाठी तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो. पुरंदर विमानतळासाठी काहींची नाराजी घ्यावी लागेल. कोणी बारामतीमध्ये अतिक्रमण करत असतील तर ते काढा. विश्वासार्ह असलेल्या बॅंकेत पैसे किंवा ठेवी ठेवा. राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवा. बारामतीच्या विकासासाठीच आपल्याला ही जागा भाड्याने दिली आहे”, असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले.

सुरेश धस नवा वाल्मिक कराड बनवत आहेत, अंजली दमानियांचे गंभीर आरोप
सुरेश धस नवा वाल्मिक कराड बनवत आहेत, अंजली दमानियांचे गंभीर आरोप.
देशमुख प्रकरणानंतर महाराष्ट्रात थरार, लोखंडी रॉड सरपंचाच्या डोक्यात
देशमुख प्रकरणानंतर महाराष्ट्रात थरार, लोखंडी रॉड सरपंचाच्या डोक्यात.
पहिले अत्याचाराचा प्रयत्न, नंतर जीवघेणा हल्ला अन्.. ; संभाजीनगर हादरलं
पहिले अत्याचाराचा प्रयत्न, नंतर जीवघेणा हल्ला अन्.. ; संभाजीनगर हादरलं.
भाई, केम छो, आता फक्त जिलेबी-फापडा, आव्हाडांचं गुजराती, कोणाला डिवचलं?
भाई, केम छो, आता फक्त जिलेबी-फापडा, आव्हाडांचं गुजराती, कोणाला डिवचलं?.
'त्याचा बॉस मीच, म्हणून.,' सतीश भोसलेच्या व्हिडिओवर धसांची प्रतिक्रिया
'त्याचा बॉस मीच, म्हणून.,' सतीश भोसलेच्या व्हिडिओवर धसांची प्रतिक्रिया.
सळईने चटके देणारा आरोपी जरांगेंसोबत! फोटो दाखवणाऱ्या भुजबळांवर निशाणा
सळईने चटके देणारा आरोपी जरांगेंसोबत! फोटो दाखवणाऱ्या भुजबळांवर निशाणा.
तुमच्या रक्तात भेसळ.., भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर राऊत संतापले
तुमच्या रक्तात भेसळ.., भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर राऊत संतापले.
कारच्या डॅशबोरवर फेकली नोटांची बंडलं; सतीश भोसलेचा व्हिडिओ आला समोर
कारच्या डॅशबोरवर फेकली नोटांची बंडलं; सतीश भोसलेचा व्हिडिओ आला समोर.
'मला चटके देताना एवढंच म्हणायचे...', 'त्या' तरूणानं सांगितली आपबीती
'मला चटके देताना एवढंच म्हणायचे...', 'त्या' तरूणानं सांगितली आपबीती.
मुंडेंच्या जागी बीडच्या आमदाराला मंत्रिपद?मराठा आमदाराची लागणार वर्णी?
मुंडेंच्या जागी बीडच्या आमदाराला मंत्रिपद?मराठा आमदाराची लागणार वर्णी?.