कोरोनाग्रस्त वाढतेच, ‘त्या’ तीन शहरांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार : अजित पवार

कोणी मास्क वापरत नाही, त्यामुळे कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. सगळे जण कोरोना कमी झाला, असं म्हणून पूर्वीसारखं राहत आहेत." अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली. (Ajit Pawar Corona Patients Lockdown)

कोरोनाग्रस्त वाढतेच, 'त्या' तीन शहरांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 12:55 PM

मुंबई : “एक फेब्रुवारीनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीत या तीन शहरात काय निर्णय घ्यायचा, यावर चर्चा करणार” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Deputy CM Ajit Pawar on increasing Corona Patients and Lockdown restrictions in Maharashtra)

“जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आणि डिस्चार्जची संख्या जास्त, अशी परिस्थिती होती. एक फेब्रुवारीनंतर आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या अमरावती विभागात जास्त दिसत आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा मध्ये रुग्ण वाढत आहेत. नाशिक विभागातही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणचा आढावा घेतला. अमरावतमीध्ये 50 टक्के बिकट  परिस्थिती पाहायला मिळाला. अमरावती विभागात मुंबईपेक्षा जास्त रुग्ण वाढत होते. कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झालीय. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

“कठोर निर्णय घेण्याची गरज”

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. दुपारी बैठकीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्या बैठकीत अमरावती, अकोला, यवतमाळ या तीन शहरात काय निर्णय घ्यायचा, यावर चर्चा होईल. फक्त तीन शहरं की ग्रामीण भागातही निर्बंध लावायचे याबाबत चर्चा करणार. कोणी मास्क वापरत नाही, त्यामुळे कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. सगळे जण कोरोना कमी झाला, असं म्हणून पूर्वीसारखं राहत आहेत.” अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.

“लग्न कार्य महत्त्वाचं की माणसांना वाचवणं?”

“लग्न कार्य महत्त्वाचं की कोरोनामध्ये माणसांना वाचवणं महत्वाचं आहे? जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर काय करायचं? मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचे आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं नियमांमध्ये शिथीलता आणली. कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली होती. जानेवारीच्या शेवटमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. 1 फेब्रुवारीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढली.”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांना चौकशी करण्यास सांगण्यात आलंय. सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. कुणाला ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. आम्ही पोलिसांना फोन करत नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुण राठोड याला ताब्यात घेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिलं आहे. (Deputy CM Ajit Pawar on increasing Corona Patients and Lockdown restrictions in Maharashtra)

संजय राठोड गायब नाहीत

संजय राठोड गायब आहेत हे कुणी सांगितलं, मी त्यांना मगाशी फोन करुन सांगितलं. संजय राठोड, यशोमती ताई, बच्चू कडू यांच्याशी मी बोललो आहे. कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर झाली तर तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मी त्यांच्या कानावर घातल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

“राज्यपालांना ‘तो’ अधिकार आहेच”

विधानसभा अध्यक्षाबाबत राज्यपालांना विचारण्याचा अधिकार आहे. चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार निर्णय घेऊन उत्तर देईल. जागा रिक्त झाल्यावर भरायची असते. ती जागा जास्त काळ रिक्त ठेवून चालत नाही, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातल्या ह्या 11 शहरांवर लॉकडाऊनचं संकट? कोरोना वाढतोय, यंत्रणा अलर्टवर!

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही? वाढत्या कोरोनावर मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय

(Deputy CM Ajit Pawar on increasing Corona Patients and Lockdown restrictions in Maharashtra)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.