परकीय गुंतवणुकीचा अहवाल प्रसिद्ध, महाराष्ट्र की गुजरात कोणाला सर्वाधिक गुंतवणूक? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हा अहवाल एप्रिल ते जून २०२४ या कालावधीतील आहे. यासोबतच त्यांनी काही आकडेवारीही दिली आहे. या आकडेवारीत त्यांनी कोणत्या राज्यात किती गुंतवणूक झाली, त्याची माहिती दिली आहे.

परकीय गुंतवणुकीचा अहवाल प्रसिद्ध, महाराष्ट्र की गुजरात कोणाला सर्वाधिक गुंतवणूक? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 10:58 AM

Maharashtra Foreign Investment Report : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच 2024-2025 या आर्थिक वर्षातील परकीय गुंतवणुकीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाल्याची मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आहे. या अहवालानुसार परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी यंदाच्या आर्थिक वर्षातील परकीय गुंतवणुकीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांचे संपूर्ण ट्वीट

“अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी !! देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!!

गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी), तिसर्‍या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी), चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी), पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी), सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी), सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी), आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी), नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी)

या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

यापूर्वी 2022-23 : 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) 2023-24 : 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे”, असे देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी शेअर केलेला हा अहवाल डीपीआयआयटी या संस्थेचा आहे. हा अहवाल एप्रिल ते जून २०२४ या कालावधीतील आहे. यासोबतच त्यांनी काही आकडेवारीही दिली आहे. या आकडेवारीत त्यांनी कोणत्या राज्यात किती गुंतवणूक झाली, त्याची माहिती दिली आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...