Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची – एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा

औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. नेहमी धर्माचा आधार घेतात” असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले.

Eknath Shinde : जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची - एकनाथ  शिंदेंचा थेट निशाणा
एकनाथ शिंदे भडकलेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2025 | 12:00 PM

ज्या औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याची तुलना तुम्ही राज्याच्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करता ? आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन राज्य चालवतो,सर्वसामान्य लोकांना न्याया देण्याचं काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना आम्ही अनेक योजना सुरू केल्या, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या, या राज्याला विकासाकडे नेलं. अडीच वर्ष आम्ही काम केलं, त्याची पोचपावती म्हणून जननेते आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिलं. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत आहोत.

या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करण्याचा आमचा अजेंडा आहे. कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस हे ? अशी तुलना करण्यापूर्वी त्यांना जनाची नाही तर मनाची तर ( लाज वाटायला) पाहिजे होती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा साधला. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. नेहमी धर्माचा आधार घेतात” असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले.

औरंगजेब यांचा कोण लागतो ?

मुघल शासक असलेला औरंगजेब हा महाराष्ट्राचा घास घ्यायला, महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला आला होता. त्याचं समर्थन करणारा कोणीही असेल, त्याला सोडण्यात येणार नाही. या देशातील सच्चा मुसलमान जो आहे, तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही. मग हे समर्थन का करत आहेत ? मग यांचा औरंगजेब कोण लागतो ? नातेवाईक लागतोय की सगासोयरा लागतो का आणखी कोण लागतोय ?असा तिखट सवाल शिंदे यांनी विचारला. औरंगजेब हा देशद्रोही आहे, तो राष्ट्रद्रोही आहे. महाराष्ट्रातील, देशभक्त जनता ही त्याला सहन करणार नाही असेही शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर या मुद्यावरून राज्यातलं रान पेटलं असून ती कबर उखडून काढा असं सत्ताधारी पक्षातील अनेकांचं म्हणणं आहे. याच कबरीच्या मुद्यावरून काल नागपुरात हिंसा , दगडफेक झाली, पोलिसही जखमी झाले. सध्या शहरात तणाव असून संचारबंदीही लागू करण्यात आली. एकीकडे या मुद्यावरून वातावरण तापलं आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमत्री फणडणवीसांवर टीका करताना त्यांची औरंगजेबाशी तुलना केल्याने आणखीनच वाद चिघधळला आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलं आहे.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....