Deputy Cm Of Maharashtra : उपमुख्यमंत्रिपदाठी फडणवीसांचं नाव चर्चेत आलं, रेसमधील तिन्ही नावं गायब झाली, कोणती नावं होती चर्चेत?

पंकजा मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन राज्याला पुन्हा एक सरप्राईज मिळणार का? हाही सवाल विचारला जात होता. मात्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री व्हावं असे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आल्याने ही रेस आता आणखी रंजक झाली आहे आणि बाकीचं नावं थेट गायबच झाली.

Deputy Cm Of Maharashtra : उपमुख्यमंत्रिपदाठी फडणवीसांचं नाव चर्चेत आलं, रेसमधील तिन्ही नावं गायब झाली, कोणती नावं होती चर्चेत?
भाजपची तीन नावं जी उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत, एक मराठा, दोन ओबीसी, कुणाला संधी?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 7:24 PM

मुंबई : राज्यात एकिकडे एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. तर दुसरीकडे आता भाजपचे उपमुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असणारे नेतेही चर्चेत आले आहेत. जसं एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करत फडणवीसांनी एक (Devendra Fadnavis) मास्टरस्ट्रोक मारला. तसेच हेही नाव आता असेच सरप्राईजिंग असणार का? असाही एक सवाल राज्याच्या राजकारणात विचारण्यात येत होता. या चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये एक मराठा तर दोन ओबीसी नेते आघाडीवर होती. भाजपकडून सध्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांची नावं चर्तेत राहिली. त्यातल्यात पंकजा मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन राज्याला पुन्हा एक सरप्राईज मिळणार का? हाही सवाल विचारला जात होता. मात्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री व्हावं असे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आल्याने ही रेस आता आणखी रंजक झाली आहे आणि बाकीचं नावं थेट गायबच झाली.

सतत डावलल्याने पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते नाराज

तर एकीकडे सतत डावल्याने पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते हे सध्या नाराज आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांची नाराजी ही उघडपणे आंदोलनं करत दाखवली आहे. काही कार्यकर्त्यांकडून तर आत्मदहनाचाही प्रयत्न झाला आहे. आधी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा ही राज्यसभेसाठी होती. मात्र राज्यसभेवरही त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर विधान परिषदेवर त्यांना पाठवणार असल्याच्याही चर्चा रंगल्या मात्र याही यादीत त्यांचं नाव असल्याने पुन्हा त्यांची संधी हुकली. आता उपमुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये त्यांचं नाव हे पुन्हा चर्चेत आलं होतं. त्यामुळे आता तरी त्यांना सधी मिळणार की यावेळीही ती संधी हुकणार? असा सवाल राजकारणात विचारण्यात येत होता.

तर रेसमध्ये अचानक फडणवीसांच्या नावाची एन्ट्री

उपमुख्यमंत्री पदासाठी आधीच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर असताना आता याच रेसमध्ये फडणवीसांचे नाव आल्याने पुन्हा नवं ट्विस्ट आलं आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हायचं ठरवल्यास इतरांची सधी ही नक्कीच हुकाणार आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्षपदासाठी अग्रही असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आणखी काय नवं ट्विस्ट येतं का? हेही पाहणं तितकेच महत्वाचं ठरणार आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चा ही कुणाच्याही नावाची असली. तरी अधिकृतरित्या नाव घोषित झाल्याशिवाय काही सांगता येत नाही. काही तासात हेही चित्र स्पष्ट होणारच आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.