Mumbai-Ahmedabad bullet train : बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील चार स्थानकांचे डीझाईन जाहीर , बीकेसी स्थानकासाठी अरबी समुद्राच्या भरती-ओहोटीच्या थिमचा वापर
508 किमी लांबीच्या साडे तीनशे किमी वेगाने धावणाऱ्याची क्षमता असणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात जमिनीचा अडथळा आता दूर झाला आहे, महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या चार स्थानकांचे डिझाईन जाहीर झाले आहे
मुंबई : मुंबई ते अहमहाबाद ( Mumbai-Ahmedabad ) दोन शहरांना जोडणाऱ्या 508 किमी लांबीच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पॅकेज – 2 मधील समुद्राखालील सात किमीसह एकूण 21 किमी लांबीच्या बोगद्याचे ( tunnel ) बांधकाम करण्याची निविदा 9 फेब्रुवारीला उघडण्यात आली आहे. या निविदेस अफकॉन आणि एल एण्ड टी या दोन कंपन्यांनी ही निविदा भरली आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने या मार्गावरील मुंबईतील चार स्थानकांचे डीझाईन जाहीर केले आहे. यात बीकेसीतील ( Bkc ) भुमिगत स्थानकाचे डीझाईन समुद्राच्या थीमवर आधारीत असणार आहे. दरम्यान, नुकताच अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनला 19, 952 कोटीचा निधी रेल्वेने मंजूर केला आहे.
बुलेट ट्रेनच्या वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्ससह (बीकेसी ) सह ठाणे, विरार आणि बोयसर या चार स्थानकांचे डीझाईन गुरूवारी प्रथमच जाहीर करण्यात आले आहे. बीकेसी स्थानक संपूर्ण भूमिगत असणार आहे.
बीकेसी स्थानक – आकाशातील ढग आणि समुद्राची भरती आणि ओहोटीच्या थीमवर त्याची डीझाईन केली आहे.
ठाणे स्थानक – ठाणे स्टेशन उल्हास नदीजवळ असणार आहे. त्यामुळे या स्थानकाच्या प्रवेशद्वार इमारतीच्या छताची लाटांसारखी तयार करण्यात आली आहे.
विरार स्थानक – विरारला जीवदानीचा डोंगर असल्याने वाऱ्याने हलणाऱ्या प्रतिमांचा स्थानकांची डीझाईन करताना वापर केला आहे.
बाेईसर स्थानक – हा किनारपट्टीचा एक भाग असल्याने स्थानिक मच्छिमार बांधवाच्या मासेमारीच्या जाळ्यांना या स्थानकात स्थान दिले आहे.
508 किमी लांबीच्या साडे तीनशे किमी वेगाने धावणाऱ्याची क्षमता असणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पाचे काम कमालीचे रखडले आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. गोदरेज एण्ड बॉयस कंपनीची जमीन अधिग्रहनाला आव्हान देणारी आणि 264 कोटीचे नुकसान भरपाई मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रातही आता वेग पकडणार आहे.
Designs of four bullet train stations in Maharashtra has been unveiled .
1)Thane 2) Virar 3)Bandra Kurla complex 4)Boisar pic.twitter.com/Kt7wpdgj1K
— THE MAHARASHTRA INDEX (@TheMahaIndex) February 10, 2023
nbsp;
बीकेसीचे एकमेव अंडरग्राऊंड स्थानक
या मार्गावरील बीकेसी हे एकमेव अंडरग्राऊंड स्थानक असणार आहे. येथे तीन माळ्याचे स्थानक असणार आहे. प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स आणि सर्व्हीस फ्लोअर असे तीन मजले असणार आहेत. जमीनीच्या पातळीपासून 24 मीटर खाली फलाट असणार आहेत. बीकेसी स्थानकासाठी 6 प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार असून ते 16 डब्याच्या ट्रेन उभी राहील या लांबीच्या असतील. हे स्थानक मेट्रो आणि रोडशी जोडलेले असणार आहे. स्थानकाला दोन एण्ट्री व एक्झीट पॉईंट असणार आहेत. एक प्रवेशद्वार मेट्रो लाईन 2 – बी बरोबर कनेक्ट केलेले असणार असून दुसरे गेट एमटीएनएल इमारतीच्या दिशेला असणार आहे. तसेच मेट्रो, बसेस, ऑटो आणि टॅक्सी या वाहतूक साधनांबरोबर हे स्थानक जोडले जाणार आहे.
आठ स्थानके गुजरातमध्ये तर चार महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण 12 स्थानके असणार असून त्यात 8 स्थानके गुजरातमध्ये तर 4 स्थानके महाराष्ट्रात असणार आहेत. साबरमती, अहमदाबाद, आणंद/नाडीयाड, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, ही आठ स्थानके गुजरातमध्ये तर बोयसर, विरार, ठाणे, बीकेसी अशी चार स्थानके महाराष्ट्रात आहेत.