लसीचे दोन्ही डोस घेतले, तरीही 23 हजार जणांना कोरोनाची बाधा, BMC चा अहवाल, वृद्धांचा आकडा चिंता वाढवणारा
लसीचे दोन्ही डोस घेऊनही हजारो जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. राजधानी मुंबईतही आतापर्यंत जवळपास वीस हजारांहून अधिक लसवंतांना कोरोनाची बाधा झालीय. मुंबईत झालेल्या एकूण लसीकरणापैकी 0.35% लोकांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली आहे.
मुंबई : लसीचे दोन्ही डोस घेऊनही हजारो जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. राजधानी मुंबईतही आतापर्यंत जवळपास वीस हजारांहून अधिक लसवंतांना कोरोनाची बाधा झालीय. मुंबईत झालेल्या एकूण लसीकरणापैकी 0.35% लोकांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली आहे. यामधील वृद्धांचं प्रमाण चिंतेत भर टाकणारं आहे.
मुंबईतल्या एकूण लसीकरणापैकी 0.35% लोकांना कोरोनाची पुन्हा बाधा होत आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या 1 लाख नागरिकांपैकी 350 लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होत आहे, असं पालिकेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. लसीकरण होऊनही कोरोना होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जातीय, पण याच प्रमाण खूप कमी आहे, असंही मुंबई पालिकेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे.
नागरिकांनी लसीबाबत भीती बाळगू नये. अहवाल तयार करते वेळी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 25.39 लाख होती. यापैकी 9001 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे झालं. म्हणजेच लसीकरणानंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण नगण्य आहे. मात्र यातही ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, ही चिंता वाढवणारी आकडेवारी आहे.
मुंबईत 20 हजारांहून अधिक लसवंतांना पुन्हा कोरोनाची लागण
मुंबईत 23 हजार 239 लसवंतांना पुन्हा कोरोनाची लागण
दोन्ही डोस घेऊनही 9 हजार जणांना कोरोनाची लागण
पहिला डोस घेऊन कोरोना झालेल्यांची संख्या 14 हजार 239
लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण हे 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे
18 ते 44 वयोगटात पहिला डोस घेऊन कोरोना लागण झालेल्यांची संख्या
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण–4420 दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 1835
45 ते 59 वयोगट पहिला-दुसरा डोस घेऊन कोरोना लागण झालेल्यांची संख्या
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण–4815 दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 2687
60 वर्षांवरील पहिला-दुसरा डोस घेऊन कोरोना लागण झालेल्यांची संख्या
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण–5004 दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 4479
एकूण लसीकरणाच्या तुलनेत लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वयोवृद्धांमध्ये अधिक
मुंबई पालिका महिलांच्या लसीकरणावर भर देणार
मुंबई महापालिका महिलांच्या लसीकरणावर भर देणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकरणाला कमी प्रतिसाद पाहता महापालिका महिलांच्या विशेष लसीकरण सत्र सुरु करणार आहे. आठवड्यातील लसीकरणाचा एक दिवस महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पुढील दोन आठवडे प्रायोगिक तत्वावर महिला लसीकरणासाठी दोन दिवसांचा स्पेशल ड्राईव्ह करण्यात येणार आहे. महिलांची लसीकरणातली टक्केवारी वाढावी याकरता महापालिका प्रयत्न करणार आहे.
महिलांच्या लसीकरणाची स्थिती काय?
मुंबईमध्ये 42.32 टक्के महिलांचे लसीकरण झाले आहे.
मुंबईमध्ये 47,13,523 महिलांनी तर, 63,07,471 पुरुषांचे लसीकरण झाले आहे.
मुंबईमध्ये 13 सप्टेंबरपर्यंत 1182 गर्भवती महिलांनी लस घेतली आहे.
(Despite both doses of vaccine, 22 thousands Mumbaikars Corona positive report BMC)
हे ही वाचा :
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट