चुकीला माफी नाही! वहिनीसोबत केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे न्यायालयाकडून दिराला दुहेरी जन्मठेप

दिराचं आणि वहिनीचं नात पवित्र मानलं जातं. पतीच्या लहान भावाला पत्नी आपल्या पोटच्या मुलासारखी सांभाळल्याची अनेकवेळा पाहिलं असेल. मात्र एक अशी घटना समोर आली होती ज्यामध्ये दिराने या नात्याला कलंक फासला होता. या घटनेने संपुर्ण तालुका हादरून गेलं होतं.

चुकीला माफी नाही! वहिनीसोबत केलेल्या 'त्या' कृत्यामुळे न्यायालयाकडून दिराला दुहेरी जन्मठेप
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 1:42 AM

बुलढाणा : दिराचं आणि वहिनीचं नात पवित्र मानलं जातं. पतीच्या लहान भावाला पत्नी आपल्या पोटच्या मुलासारखी सांभाळल्याची अनेकवेळा पाहिलं असेल. मात्र एक अशी घटना ज्यामध्ये वहिनीला तिच्याच दिराने संपवलं होतं.  दिराने इतका टोकाचा निर्णय घेत मृत्यूच्या दारात ढकललं. न्यायालयाने त्या मृत वहिनीला न्याय देत आरोपी दिराला शिक्षा सुनावली आहे.

खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे झालेल्या जागेच्या वादातून वहिनीच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या दिराला न्यायालयाने आजन्म दुहेरी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे, खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

नेमकं काय घडलं होतं? हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गणेशपूर येथे पांडुरंग मनोहर लठाड याने जागेच्या वादातून त्याची वहिनी दुर्गा गुणवंत लठाड यांना 26 नोव्हेंबर 2016 रोजी पहाटे साडेचार वाजेदरम्यान अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली होती, ज्यामध्ये उपचारादरम्यान दुर्गाचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आरोपी पांडुरंग लठाड विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून, दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले, न्यायालयाने 11 साक्षीदार तपासले, यात मृतक महिलेचा पती फितूर झाला, मात्र मृतकाचे बयाण, डॉक्टर आणि पोलीस अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम 302 मध्ये आजन्म कारावास आणि दहा हजार रुपये दंड तर भादंवि कलम 449 मध्ये आजन्म कारावास आणि दहा हजारांचा दंड ठोठावला आहे, तर दंड न भरल्यास 3 महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कर (भालेराव) यांनी काम पाहिले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.