जेलमध्ये जाण्यापेक्षा राजभवनावर गेलेलं बरं, मुख्यमंत्र्यांच्या मोर, सापाला फडणवीसांचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांचीटीका भाजपलाही चांगलीच बोचली आहे. भाजप नेत्यांकडून आता यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या गोव्यात प्रचार करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलंय.

जेलमध्ये जाण्यापेक्षा राजभवनावर गेलेलं बरं, मुख्यमंत्र्यांच्या मोर, सापाला फडणवीसांचं प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांवर फडणवीसांचा पलटवार
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 5:52 PM

गोवा : आज सकाळी राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी (Cm Uddhav Thackeray) विरोधकांना खोचक टोलेबाजी केली. भाजप नेते सारखे राजभवनावर राज्यपलांकडे जातात आणि राज्य सरकारची तक्रार करतात. त्यावर बोलताना राजकीय हवा कशीही असू द्या. पण मलबार हिलची हवा चांगली असते. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. या आवारात मोरही आहेत. विषारी नागही आहेत. सर्प मित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो, असंही ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही टीका भाजपलाही चांगलीच बोचली आहे. भाजप नेत्यांकडून आता यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या गोव्यात प्रचार करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलंय. राजभवर जाणे म्हणजे ती योग्य जागा आहे, त्या ठिकाणावर तर ऑबजेक्शन घेता कामा नये. तुमचे मंत्री जेल मध्ये जातायत. आणखी तुमचे मंत्री कुठे कुठे जातायत हे मला सांगता देखील येत नाही. त्यामुळे राजभवनावरच्या हिरवळीवर जा राजभवनावर गेल्यावर सदबुद्धी मिळेल. असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

संजय राऊतांना खुलं आव्हान

तसेच राजभवनावर जाण्याने तुमचे मंत्री भष्ट्राचार कमी करत आहेत, महराष्ट्राची लूट चालली आहे. ती बंद होईल. त्यामुळे सदबुद्धी घेण्यासाठी तरी राज्यभवनावर जावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच संजय राऊत जे डायलॉग ते मारतात ते पाचवीतीली मुलं सुद्धा मारत नाहीत, कोण घाबरणार यांना, ते अस्वस्थ आहेत ते दिसतंय त्यामुळे मनात येईल ते बोलायचं हे कोण खपवून घेणार नाही. कुणी काही बोलून चालत नसतं, जशाच तसं उत्तर देवू आम्ही अशा गोष्टी ऐकणार नाही, असेही फडणवीसांनी राऊतांना ठणकावले आहे. तसेच राऊतांच्या आरोपावर बोलताना, तुमचे म्हणणं कोर्टासमोर मांडा व्यवस्थेसमोर मांडा. तुम्ही उपराष्ट्रपतींकडे माडलं तर आता आंतराष्ट्रीय कोर्टात जावून मांडा, असा टोलाही त्यांनी लगवाला आहे.

सोमय्यांच्या हत्येचा कट दिसतोय

सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीवरही त्यांनी पुन्हा भाष्य केलंय. जे व्हिडिओ समोर आले त्यात सोमय्या यांच्या हत्येचा कट दिसतोय. विरोधकांची हत्या करायची हे शिकतोय या महाराष्ट्रात. लोकशाही, पुरोगामी महाराष्ट्र हाच काय? तुमचे भष्ट्राचार बाहेर काढले तर मारायचे? मी सष्टपणे या सरकारला सांगतो तुम्ही काही केलं तरी भष्ट्राचार बाहेर काढणार. तुम्ही अंगावर आलात तर सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिशन महाराष्ट्रमध्ये भष्ट्राचारी लुटारू जे लोकं लुटतायत त्यांचा पर्दाफाश करेल आणि भाजपा पूर्ण बहुमतांनी सरकार आणेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पहिल्यांदा शिवसेनेनी महाराष्ट्र पोलिसांच्या ओव्हरटाईमकडे लक्ष्य द्यावे. त्यासोबत महाराष्ट्र पोलिसांमध्ये झालेले भष्ट्राचार पाहवे, अनेकांवर नाहक गुन्हे दाखल करता, राजकीय व्यक्तीवर गुन्हे, केंद्रीय मंत्र्यांचा अटक ही कुठली लोकशाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्याचबरोबर कुठली चूक नसताना ईडीनं कारवाई केलीय ते दाखवावं असे आवाहन देत हे सरकार आणि नेते कांगावाखोर नेते आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Photo Gallery: ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय’, सोमय्या आत, कार्यकर्ते पायरीवर

संजय राऊत तुम्ही फडणवीसांच्या घराबाहेर याच आम्ही बघू, भाजपचं राऊतांना थेट आव्हान

राजकीय हवा कशीही असू द्या, मलबार हिलची हवा चांगली असते; मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.