“सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हा”, शरद पवारांची मागणी, फडणवीस म्हणाले “नजरेसमोर खुर्ची…”

"आम्हाला काही माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. मूळ चौकशीला अफेक्ट होणार नाही, तेवढीच माहिती पोलीस देतील", असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हा, शरद पवारांची मागणी, फडणवीस म्हणाले नजरेसमोर खुर्ची...
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 3:07 PM

Devendra Fadnavis Attack On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एका आरोपीचे नाव करनैल सिंह असे असून तो हरियाणातील आहे. तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असून धर्मराज कश्यप असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर सध्या विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी भाष्य केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. “शरद पवारांना केवळ सत्ता हवी. इतकी गंभीर घटना झाल्यावरही त्यांच्या नजरेसमोर खुर्ची आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“त्यांच्या नजरेसमोर खुर्ची”

“गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे”, असे शरद पवार म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शरद पवारांना केवळ सत्ता हवी. इतकी गंभीर घटना झाल्यावरही त्यांच्या नजरेसमोर खुर्ची आहे. आमच्यासमोर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा विकास आहे. महाराष्ट्राची जनता आहे. त्यांना खुर्चीवर बोलायचं ते बोलावं”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

“काही धागेदोरे मिळत आहेत”

“माझी स्वत:ची बाबा सिद्दीकीशी मैत्री होती. आम्ही सोबत काम केलं. दोन आरोपी पकडले. चौकशी सुरु आहे. काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगलही मिळत आहेत. त्यावर बोलणं योग्य नाही. कस्टडी झाल्यावर जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती पोलीस देईल. काही थिअरीज मांडल्या जात आहे. तशा न्यूज येत आहे. आम्हाला काही माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. मूळ चौकशीला अफेक्ट होणार नाही, तेवढीच माहिती पोलीस देतील”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.