रात्रीस खेळ चाले ! पुण्यात भाजपची तब्बल 7 तास खलबतं, बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत..

कसबा आणि चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून रणनीती आखली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत.

रात्रीस खेळ चाले ! पुण्यात भाजपची तब्बल 7 तास खलबतं, बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत..
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 8:47 AM

अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी, पुणे : कसबा आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक ( Pune Election ) ऐन रंगात आली आहे. यामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असतांना दुसरीकडे भाजपची मॅरेथॉन बैठक पार पडली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीस एकूण चार मंत्री उपस्थित होते. तब्बल सात तास ही मॅरेथॉन बैठक पार पडली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत विविध घटकातील प्रमुख लोकांची उपस्थिती होती. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवस्थानी ही बैठक पार पडली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी व्यापारी वर्गातील काही दिग्गज मंडळींचीही भेट घेतली आहे. ज्यांचा पुण्यातील कसबा पेठ मतदार संघात मोठा व्यापारी वर्ग आहे.

बैठकीला कोण-कोण उपस्थित ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची उपस्थिती होती. याशिवाय बडे उद्योजक असलेले पुनीत बालन आणि फत्तेचंद रांका यांचीही यांच्यासोबतही बैठक पार पडली. कसबा आणि चिंचवड मतदार संघात प्रचार करण्याबरोबरच निवडणूक विजयी होण्यासाठी रणनीती थरविण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पुनीत बालन आणि फत्तेचंद रांका यांची ताकद काय? 

दोघेही पुण्यातील मोठे उद्योजक आहेत. पुनीत बालन हे सामाजिक क्षेत्रातही काम करत असतात. तर फत्तेचंद रांका हे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत. 42 हजारांहून अधिक व्यापारी त्यांच्या संघटनेचे सदस्य आहे. त्यामध्ये 70 टक्के व्यापारी हे पुण्यातील कसबा पेठेतील आहे. दोघांची आर्थिक ताकदही मोठी आहे.

गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक – 

पुण्यातील मानाचे पाच गणपती हे कसबा पेठ मतदार संघात येतात. त्यातील सर्व पदाधिकारी हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीला हजर होते. त्यामध्ये गणेश मंडळाच्या माध्यमातून प्रचाराची रणनीती ठरविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कसब्यातील उमेदवार हेमंत रासने हे गणेश मंडळाचे पदाधिकारी असल्याने त्यावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.

सात तासाच्या मॅरेथॉन बैठकीत काय चर्चा – 

निवडणुका कुठल्याही असो भाजपकडून जोरदार तयारी केली जाते. भाजपकडून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांच्यासोबत मंत्री आणि स्वतः चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित आहे. प्रचार सभा आणि स्थानिक पातळीवरील महत्वाचे मुद्दे याशिवाय याच काळात स्वतः अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार असल्याने त्याचेही नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.