शपथविधी आधी देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन

Devendra Fadnavis Called To Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्या आधी हालचालींना वेग आला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीसांनी शरद पवारांना फोन का केला? वाचा सविस्तर...

शपथविधी आधी देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन
देवेंद्र फडणवीस, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 12:03 PM

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज होत आहे. या आधी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला आहे. शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण

माजी मुख्यमंत्री तसंच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना आजच्या शपथ विधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शपथ विधी सोहळ्याला उपस्थित रहावं, यासाठी त्यांना निमंत्रित केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना विनंती केली आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच इतर काही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला राजशिष्टाचाराप्रमाणे राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. यात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. संसदेच्या अधिवेशनामुळे शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. तर उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यााबाबतची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

फडणवीस सरकारचा आज शपथविधी

आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार अशी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे. 11 डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात इतर मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.