अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच! पण ‘हे’ शब्दही… फडणवीसांचा कुणाला इशारा?
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे मी समर्थन करणार नाही, पण खोके आणि अजून काय काय असं म्हणत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात होत्या, आंदोलन करत सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून केली जात असून सत्तार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्या विधानाला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. एकूणच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा विरोध करत राजकारण खूप खालच्या थराला जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कोणीही महिलांबद्दल अपशब्द बोलू नये, ते अतिशय चुकीचे आहे, आम्ही त्याचा विरोध करू अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, जशी आमच्या लोकांना लागू आहे तसे त्यांच्याही लोकांना लागू आहे. मला मला त्याच्यामध्ये जायचे नाही, राजकारणात आचारसंहिता पाळली गेली पाहिजे असं मत फडणवीस यांनी मांडले आहे.
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे मी समर्थन करणार नाही, पण खोके आणि अजून काय काय असं म्हणत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळली गेली पाहिजे, राजकारणात पातळी खूप खालच्या स्तरावर गेली असून दोन्ही बाजूच्या मोठे नेत्यांनी हे सांगितले पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
अन्यथा खालच्या नेत्यांनी वेगळं बोलायचे आणि मुख्य नेत्यांनी वेगळं बोलायचे, असं योग्य होणार नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात असं व्हायला नको असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचा विरोध केला असून महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर जायला नको असं मत मांडलं आहे.