मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच….; गटनेता निवडीच्या बैठकीत स्वत: फडणवीसांनीचं मोठं विधान

Devendra Fadnavis on Maharashtra New CM : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. भाजपची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. वाचा सविस्तर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच....; गटनेता निवडीच्या बैठकीत स्वत: फडणवीसांनीचं मोठं विधान
देवेंद्र फडणवीस, नेते, भाजपImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 1:20 PM

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवस चर्चेत होता. याचं उत्तर अखेर आज मिळालं आहे. भाजपच्या गटनेतापदाची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे, नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आपणच असणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. भाजपने तीन वेळा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे मी आभार मानतो, असं फडणवीसांनी म्हटलं. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील, हे आता निश्चित झालं आहे. याआधी 2014 आणि 2019 ला मुख्यमंत्री झाले होते. आता तिसऱ्यांदा ते उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर फडणवीस काय म्हणाले?

२०१९ रोजी जनतेचा कौल मिळाला होता. पण दुर्देवाने तो हिसकावून घेतला गेला. जनतेसोबत बेईमानी झाली. त्या इतिहासात जात नाही. आपल्याला नवी सुरुवात करत आहोत. अडीच वर्षात आपल्याला त्रास दिला,. आमदारांना त्रास दिला. अशा परिस्थित अभिमान आहे, या अडीच वर्षात एकही आमदार सोडून गेला नाही. सर्व आमदार नेते संघर्ष करत होते. त्यातूनच २०२२ मध्ये आपलं सरकार आलं. त्यातूनच आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, असं फडणवीसांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री!

भाजपला १३२ आणि महायुतीला २३७ जागा मिळाल्या. हा महाराष्ट्रातील अभूतपूर्व यश आहे. मोदींचं आभार मानेल. बुथचा कार्यकर्ता म्हणून, वॉर्डाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. अशा व्यक्तीला तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. एकदा ७२ तासांसाठी होतो. पण टेक्निकली मुख्यमंत्री होतो. हा पक्ष मोठा झाला. त्यांनी संधी दिली. मी मोदींचं आभार मानतो, असं फडणवीस म्हणालेत.

तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एक दिलाने सर्वांना सोबत घेऊन. एवढा मोठा कौल असल्यावर सर्व गोष्टी सर्वांच्या पूर्ण करता येत नाही. पण मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत. पदासाठी किंवा कुणी तरी मोठं करावं यासाठी आलो नाही. चार गोष्टी मनासारख्या होतील. तर चार गोष्टी मनासारख्या होणार नाही. लार्जर इंट्रेस्टमध्ये काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ, असं फडणवीस म्हणालेत.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.