मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमचं सोल्युशन…; नांदेडच्या सभेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis on Marathawada Paniprashna : निवडणूक प्रचाराच्या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेडमध्ये आहेत. किनवटच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. त्यांनी हा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो? यावर भाष्य केलंय.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर कायमचं सोल्युशन...; नांदेडच्या सभेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 1:58 PM

नांदेडच्या किनवटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. किनवट मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भिमराव केराम विरुद्ध प्रदीप नाईक अशी लढत किनवटमध्ये होणार आहे. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाष्य केलं. वर्षानुवर्षे मराठवाड्यात पाणी प्रश्न सतावतो आहे, यावर उपाय काय?, ते फडणवीसांनी सांगितलं आहे. पाणी गोदावरीच्या खोऱ्यात 54 टीएमसी आलं तर मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी किनवटच्या सभेत म्हटलं आहे.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाष्य

उच्च पातळी बंधार्‍यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. निम्न पैनगंगा धरण केलं तर 95 गाव बुडणार आहेत. म्हणून तो निर्णय मी बदला आहे. या 95 गावाला मी विस्थापित होऊ देणार नाही. मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून नोंद झाले आहे. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ भाऊ देणार नाही. 54 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आलं तर पाणी प्रश्न मिटेल ते काम आम्ही सुरू केलं आहे. मोदींनी सांगितलं आहे देवेंद्र, एकनाथ शिंदेजी चिंता करू नका. लागेल तो पैसा देऊ. मराठवाड्यात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भीमराव केराम यांच्या प्रचारासाठी आपण एकत्र आलो आहोत. पहिल्या 2.5 वर्षात एक रुपयाचा निधी महाविकास आघाडी सरकारने दिला. आपलं सरकार आल्यानंतर हजारो कोटी रुपयांचं काम भीमराव केराम यांनी केलं. आता चिंता करायचं काम नाही सरकार आपलच येणार आहे. आता पाच वर्षासाठी सरकार आल्यानंतर किनवट मतदार संघातील एकही ठेवणार नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेवर भाष्य

पुढच्या 5 वर्षात 25 लाख तरुणांना रोजगार देण्याच काम आपण करणार आहोत. लेक लाडकी योजना आणली, मुलीच्या जन्माचे स्वागत झालं पाहिजे अशा प्रकारची योजना आहे. अर्ध्या तिकिटात महिलांसाठी प्रवास सुरू केल्याने घाट्यात असलेली एसटी नफ्यात आली आहे. एवढा मोठ्या प्रमाणात महिलांनी एसटीने प्रवास सुरू केला आहे. मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत. ते मामा तिला शिकवतील, मुलींसाठी शिक्षण मोफत केलं, असं त्यांनी म्हटलं.

जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना आणली. तेव्हा विरोधक बोलत होते त्याच्या नाकावर टिचून योजना आणली. सावत्र भाऊ कोर्टात गेले पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. महाविकास आघाडीचे लोक निवडून आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार.पवार साहेब, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे तेच म्हणत आहेत. पण ही योजना सुरु राहील, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.