Fadnavis on Pawar: हे भयावह आहे, आधी अजित पवार आणि आता फडणवीस, पोलिसांच्या अपयशावर मोठं प्रश्नचिन्ह, वळसे पाटलांची अडचण वाढतेय?

शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणाची किंमत दिलीप वळसे-पाटलांना चुकवावी लागू शकते. स्वपक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून टीकेचे धनी झालेल्या वळसे-पाटलांची गृहमंत्री पदाची खुर्ची जाणार का, अशी चर्चा जोरात सुरू झाल्यास नवल नको वाटायला.

Fadnavis on Pawar: हे भयावह आहे, आधी अजित पवार आणि आता फडणवीस, पोलिसांच्या अपयशावर मोठं प्रश्नचिन्ह, वळसे पाटलांची अडचण वाढतेय?
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री.
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 10:59 AM

कोल्हापूरः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची अडचण वाढते आहे का, त्यांच्या पदावर टांगती तलवार आहे का, असे विचारण्याचे कारण म्हणजे शुक्रवारी अचानकपणे आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर केलेला हल्ला. या हल्ल्याची माहिती आधी मीडियाला कळाली आणि नंतर पोलीस आले याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात बोलताना जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना नेमके याच मुद्यावर बोट ठेवले. त्यांनी पोलिसांच्या अपशयावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. एकीकडे विरोधकांचे सुटणारे वाकबाण आणि दुसरीकडे स्वपक्षातून दिग्गजांचे मिळणारे खडे बोल पाहता आता अनिल देशमुखानंतर एका वेगळ्याच कारणासाठी दिलीप वळसे-पाटील यांचे गृहमंत्री पद जाणार का, अशी चर्चा रंगताना दिसतेय. याचे उत्तरही येणाऱ्या काळात मिळेलच.

अजितदादांचे वर्मावर बोट

अजित पवार पुण्यात बोलताना म्हणाले की, माझे स्पष्ट मत आहे की, वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचे काम त्यांचे (पोलिसांचे) असते. त्यामध्ये हे लोक कुठे तरी कमी पडले हे निर्विवाद सत्य आहे. कारण ते लोक जेव्हा तिथे आले होते, तेव्हा त्यांच्यामागे मीडियाचे पण कॅमेरे आहेत. मीडियाचे कॅमेरे येतात म्हणजे मीडिया बरोबर माहिती होती, मीडियाचे पण ते काम आहे. कुठे काय चालले आहे ते अॅक्युरेटपणे दाखवायचा प्रयत्न करायचा. मग हे जर मीडियाने शोधून काढले तर पोलीस विभागाच्या संबंधित यंत्रणेला का नाही शोधून काढता आले नाही. त्याबद्दल एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशी करायला सांगितल्याचेही ते म्हणाले.

फडणवीस म्हणतात भयावह…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये यावर भयावह या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस म्हणाले की, एसीट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. मात्र, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची माहिती मीडियाला होती, मग पोलीस काय करत होते. पोलिसांची चौकशी व्हायला हवी. हे अतिशय भयावर असे चित्र होते. पोलिसांचे हे मोठे अपयश आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. या हल्ल्याचा आम्ही निषेधच करतो, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एकंदर स्वपक्ष, सरकार आणि आता विरोधी पक्षांकडून टीकेचे धनी झालेल्या दिलीप वळसे-पाटलांची गृहमंत्री पदाची खुर्ची जाणार का, अशी चर्चा जोरात सुरू झाल्यास नवल नको वाटायला. इतर बातम्या : 

Sharad Pawar: पवारांच्या घराबाहेर तासभर राडा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण…

ST Andolan Mumbai : ज्या भगिनी विधवा झाल्या…, पवारांच्या घरी काढलेल्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.