Devendra Fadnavis: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे का?; फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे का?; फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे का?; फडणवीस काय म्हणाले? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 1:59 PM

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. आपल्याच नेत्याची सुरक्षा करू शकत नाहीत ते जनतेची काय सुरक्षा करतील असा सवाल भाजप (bjp) नेत्यांकडून केला जात आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनाच थेट प्रश्न विचारण्यात आला. भाजप नेते राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत. तुमचं काय मत आहे? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर, भाजपमध्ये असं काही ठरलं नाही. ती भाजपची अधिकृत भूमिका नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी फडणवीस कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणीही फेटाळून लावली.

मनसेने आज राम नवमी निमित्त मुंबईत हनुमान चालिसा सुरू केला आहे. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हनुमान चालिसा ही आपली परंपरा आहे. काही लोकांना हनुमान चालिसाचा का राग येतो? भोंगे वाजल्याने राग येत नसेल तर हनुमान चालिसाने राग का येतो? असा सवाल फडणवीस यांनी केला.

मी तिसऱ्याचा प्रवक्ता नाही

शिवसेनेचं हिंदुत्व संपलं आहे, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणत आहेत. त्याबाबत फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर फडणवीस यांनी पत्रकारांनाच फैलावर घेतलं. संदीप देशपांडे काय म्हणतात हे मला कशाला विचारता? तुम्ही आमच्या बद्दल विचारा ना. मी तिसऱ्याचा प्रवक्ता नाही. मी भाजपचा नेता आहे, असं फडणवीस चिडून म्हणाले.

तर प्रश्न निर्माण होणारच

शिवसेनेच्या विभागप्रमुखाने ऊर्दूत कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असा त्यावर उल्लेख केला. त्यावेळीच शिवसेना ही सुडो सेक्युलरवादी झाली. शिवसेना छद्म धर्मनिरपेक्षवादी झाली. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. प्रार्थनेला विरोध नाही. आमचा फक्त लांगूलचालनाला विरोध आहे. शिवसेनेचे नेते अजान क्लासेस घेत असतील तर प्रश्न निर्माण होणारच, असंही ते म्हणाले.

नानांना भगव्याचा राग का?

यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. न पाहता, न समजता त्यांना बोलायची सवय आहे. त्यांना भगव्याचा राग का आहे? भगवं म्हटल्यावर चीड का येते? इतरांबाबत लांगूलचालन का करत आहेत? त्यांना कितीही भगव्याचा तिटकारा असला तरी हा छत्रपतींचा भगवा आहे घेऊन आम्ही पुढे जाणारच, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Kolhapur | पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट, सत्तेसाठी देशात हिटरशाही, कोल्हापुरात नाना पटोलेंचा हल्लाबोल

Raosaheb Danve: राज ठाकरेंनी मला पेढे दिले, मी त्यांना रेल्वेचं इंजिन गिफ्ट दिलं; रावसाहेब दानवेंना नेमकं सांगायचंय काय?

मनसेला भाजपची रसद; मंदिरावर लावण्यासाठी कंबोजांकडून 10 हजार भोंग्यांची ऑर्डर; म्हणे, राऊत जेलमध्ये जाणार!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.